नवी दिल्ली - आज राज्यसभेत 2000 च्या नोटेचा मुद्दा स्वतः बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजप खासदार सुशील मोदी यांनी उपस्थित केला. बाहेर येत त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, आज सामान्य व्यवसायात कुठेही त्याचा वापर होत नाही. आरबीआयने तीन वर्षांपासून छपाईही बंद केली आहे. दरम्यान, भाजपचेचं आणखी एक खासदार निशिकांत दुबे यांनी संसदेत बोलताना सरकार कधीही दोन हाजारच्या नोटांबाबात बंदची घोषणा करू शकते, असे संकेत दिले आहेत.
मुदत देऊन बाजारातून माघार घेण्याची मागणी - त्याविषयी बोलताना सुशील मोदी म्हणाले की, नोटाबंदीनंतर 2000 च्या नोटा जारी करण्यात आल्या ज्यामुळे अल्पावधीत नोटा बदलता येतील. आता ही गुलाबी नोट बाजारातून हद्दपार करावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. सुशील मोदी म्हणाले की, अशी व्यवस्था केली पाहिजे, की ज्यांच्याकडे 2000 च्या नोटा आहेत ते ठराविक वेळेत त्या बदलू शकतील आणि नंतर त्या पूर्णपणे बाजारातून काढून टाकल्या जातील.
2000 च्या नोटेचे कारण काय? - सुशील मोदी पुढे म्हणाले की, जगातील सर्व विकसित देश, अमेरिका, जपान, चीन यांच्याकडे 100 पेक्षा जास्त चलन नाही. अशा परिस्थितीत भारतात 2000 च्या नोटेचे औचित्य काय आहे? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. आम्ही 1000 ची नोट पूर्ण केल्यावर आता 500 2000 च्या नोटेची गरज नाही. एटीएममधून 2000 च्या नोटा निघून काही महिने झाले आहेत, असे विचारले असता सुशील मोदी म्हणाले, की लोकांनी त्या जमा केल्या आहेत. ते म्हणाले की 2 लाख रुपये ठेवायचे असतील तर ते एका छोट्या पिशवीत सहज ठेवता येतील, काळा पैसा वापरणाऱ्या लोकांना 2000 च्या नोटा कुठेही नेणे सोपे आहे, त्यामुळे काळ्या पैशाच्या विरोधात मोहीम राबवणाऱ्या सरकारने यावर निर्णय घ्यावा आणि ही नोट लवकर बंद करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
2000 रुपयांची नोट बदलण्यासाठी दोन वर्षांची मुदत - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या घोषणेनंतर नोव्हेंबर 2016 मध्ये 2,000 रुपयांची नोट चलनात आली. त्यावेळी चलनात असलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा तत्काळ प्रभावाने अवैध घोषित करण्यात आल्या. राज्यसभेत बोलताना सुशील मोदी यांनी 2000 रुपयांच्या नोटा प्रिमियमवर विकल्या जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच, २००० रुपयांच्या नोटांचा वापर मनी लाँड्रिंग, टेरर फंडिंग, ड्रग स्मगलिंगमध्ये होत आहे. देशातील सर्वोच्च मूल्याची नोट काळ्या पैशाचा समानार्थी बनली आहे. मी सरकारला विनंती करतो की हळूहळू- 2000 रुपयांची नोट टप्प्याटप्प्याने बंद करावी. सर्वसामान्य नागरिकांना 2000 रुपयांची नोट बदलण्यासाठी दोन वर्षांची मुदत द्यावी.