ETV Bharat / bharat

Surya sankranti 2023 : आज तूळ संक्रांतीच्या दिवशी राशीनुसार करा उपाय; उजळेल भाग्य - zodiac sign

Surya sankranti 2023 : आज 18 ऑक्टोबर 2023 रोजी तूळ संक्रांती आहे. आजच्या दिवशी काही विशेष गोष्टींचे दान केल्यानं भाग्य उजळतं. तुम्हाला आर्थिक बळ मिळेल आणि तुमची कीर्ती, भाग्य आणि वैभव वाढेल. जाणून घ्या तुमच्या राशीनुसार काय आहेत सूर्य संक्रांतीतील उपाय...

Surya sankranti 2023
तूळ संक्रांती
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 18, 2023, 12:29 PM IST

हैदराबाद : आज तूळ संक्रांती, सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश होण्याला संक्रांती म्हणतात. वर्षभरात एकूण 12 संक्रांती येतात. आज सूर्य कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करत आहे. तुमच्या राशीनुसार काय आहेत सूर्य संक्रांतीतील उपाय घ्या जाणून.

मेष :आज सूर्य तूळेत प्रवेश करत आहे. या एका महिन्यात आपले मतभेद वाढू शकतात. वैवाहिक जोडीदाराशी संवाद साधताना शांत राहावे. आपली आर्थिक स्थिती सामान्य राहील. खर्च वाढतील. या दरम्यान आपण प्रवास सुद्धा करू शकता.

उपाय : कुंकू मिश्रित पाण्याने सूर्यास अर्घ्य द्यावा.

वृषभ : सूर्याचे हे राशी परिवर्तन आपल्यासाठी चांगले असेल. आपले विरोधक कमी होतील. परदेशाशीसंबंधित कामात आपला फायदा होईल. या दरम्यान एखाद्या जुनाट आजारातून सुद्धा आपली सुटका होऊ शकते.

उपाय : रोज गायत्री चालिसाचे पठन करावे.

मिथुन : सूर्याचे हे राशी परिवर्तन आपणास सामान्याहून चांगले फळ देणारे आहे. आपण एखाद्या उच्च शिक्षणात भरीव कामगिरी कराल. या दरम्यान घरासाठी एखादे वाहन किंवा अंतर्गत सजावटीसाठी सामानांची खरेदी करू शकता. आपल्या सन्मानात वाढ होईल.

उपाय : आदित्य हृदय स्तोत्राचे पठन करावे.

कर्क : सूर्याचे हे राशी परिवर्तन आपल्यासाठी काहीसे त्रासदायी होऊ शकते. नोकरीत आपली बदली संभवते. या दरम्यान आपणास आपल्या मातेच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आपले जीवन सामान्यच राहील.

उपाय : सूर्याष्टकाचे पठन करावे.

सिंह : आता सूर्य तूळेत प्रवेश करेल. ह्या दरम्यान आपणास नशिबाची साथ मिळेल. आपणास कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. आपल्याला प्रवासात काळजी घ्यावी लागेल. आपल्या पराक्रमात वाढ होईल.

उपाय:-गायत्री मंत्राचा एक माळ जप करावा.

कन्या : सूर्याचे तूळेतील भ्रमण आपल्यासाठी सामान्यच आहे. या दरम्यान कुटुंबियांसह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याचा कार्यक्रम ठरवू शकता. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली आपली कामे पूर्णत्वास जाऊ शकतात.

उपाय : सूर्यास रोज अर्घ्य द्यावा.

तूळ : या एक महिन्या दरम्यान सूर्य आपल्याच राशीतून भ्रमण करणार आहे. ह्या दरम्यान आपण अहंकारी होऊ शकता. व्यावसायिक भागीदाराशी आपले मतभेद वाढू शकतात.या दरम्यान कोणतेही काम रागाच्या भरात करू नये.

उपाय : गाईस गहू व गूळ खाऊ घालावा.

वृश्चिक : सूर्याचे तूळ राशीतील भ्रमण आपल्यासाठी सामान्याहून पुष्कळच चांगले असेल. विरोधकांवर आपण मात करू शकाल. ह्या महिन्यात कोणालाही पैसे उसने देऊ नये. आरोग्याची काळजी घ्यावी.

उपाय : सूर्याष्टकाचे पठन करावे.

धनु : सूर्याचे हे राशी परिवर्तन आपल्यासाठी चांगले आहे. ह्या दरम्यान आपल्या सामाजिक सन्मानात वाढ होईल. प्राप्ती व खर्च ह्यात समतोल साधला जाईल. नवीन काही खरेदी करण्याची योजना आखू शकता.

उपाय :या दरम्यान आपण भगवान श्रीशंकर ह्यांचे पूजन करावे.

मकर : सूर्याचे तूळेतील भ्रमण आपल्यासाठी सामान्यच राहील. ह्या दरम्यान आपणास कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. नोकरीत उन्नती होईल, मात्र एखाद्या लालसेपोटी स्वतःचे नुकसान सुद्धा करून घ्याल.

उपाय : माता - पित्याच्या पायी पडून दिवसाची सुरवात करावी.

कुंभ : सूर्याचे तूळ राशीतील भ्रमण आपल्यासाठी भाग्योदय कारक ठरेल. ह्या दरम्यान आपला आत्मविश्वास उंचावेल. एखाद्या मंगल कार्यास किंवा तीर्थ यात्रेस सुद्धा जाऊ शकता.

उपाय :दर रविवारी उपवास करून गाईस गूळ खाऊ घालावा.

मीन : सूर्याचे तूळ राशीतील भ्रमण आपल्यासाठी काहीसे आव्हानात्मक असेल. वाहन चालवताना आपणास

विशेष काळजी घ्यावी लागेल. ह्या दरम्यान मौन राहून संभाव्य वाद टाळण्याचा प्रयत्न करावा.

उपाय : सूर्याष्टकाचे पठन करावे.

हेही वाचा :

  1. Today Horoscope : 'या' राशीच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होईल; वाचा राशीभविष्य
  2. Today Love Horoscope : 'या' राशीच्या विवाहयोग्य व्यक्तींचे नाते निश्चित होण्याची शक्यता; वाचा लव्हराशी
  3. Today Panchang : सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.