बंगळुरु- कर्नाटक मधील विजयनगर येथील एका खासगी रूग्णालयात एका गर्भवती महिलेने, पायाला ९ बोट असणाऱ्या मुलाला जन्म दिला आहे. यामुळे डाॅक्टरांसह सर्व आश्चर्यचकीत झाले आहेत. जन्माला आलेल्या या नवअर्भकाच्या उजव्या पायाला नऊ बोटे आहेत आणि डाव्या पायाला सर्वसाधारण मुलांसारखी ५ बोटे आहेत.
आई आणि बाळ यांची प्रकृती उत्तम
सध्या आई आणि बाळ यांची प्रकृती उत्तम आहे. गर्भवती महिला होसपेट तालुक्यातील रहिवासी आहे,असे याविषयी ईटीव्ही भारत सोबत बोलताना डॉक्टर भालचंद्रन यांनी सांगितले. ९ बोटे असणाऱ्या मुलाचा जन्म अतिशय दुर्मिळ आहे, याशिवाय आपल्याला पहिल्यांदा माहीत नसते की जन्माला येणाऱ्या बाळाच्या पायाला किती बोटे आहेत, मुल जन्माला आल्यानंतर समजते त्याच्या पायाला किती बोटे आहेत.
हेही वाचा-मास्क घातला नाही, म्हणून पाय आणि हातामध्ये ठोकला खिळा; पोलिसांवर आरोप