ETV Bharat / bharat

Valentine Day 2023 : नवऱ्यासाठी बनवले सोन्याचे दिल, सूरतच्या तरुणीचे अनोखे व्हॅलेन्टाईन गिफ्ट - तरुणीने नवऱ्यासाठी बनवले सोन्याचे दिल

व्हॅलेन्टाईन डे साजरा करण्यासाठी तरुणाईमध्ये उत्साह सळसळला आहे. आपल्या प्रियकर आणि प्रेयसीला गिफ्ट देण्यासाठी तरुणाई अनेक योजना आखत आहे. सूरतच्या तरुणीने मात्र आपल्या पतीला सोन्याचा मुलामा असलेल्या गुलाबाचे हृदयाच्या आकाराचे गुच्छ व्हॅलेन्टाईन गिफ्ट बनवले आहे. त्यामुळे या खास गिफ्टची आता चांगलीच चर्चा रंगली आहे. परिधी असे तरुणीचे नाव असून दीप असे तिच्या पतीचे नाव आहे.

Valentine Day 2023
तरुणीने बनवलेले खास व्हॅलेन्टाईन गिफ्ट
author img

By

Published : Feb 13, 2023, 9:20 PM IST

सूरत : तरुणाईचा आवडता व्हॅलेंटाईन डे उद्या जगभरात साजरा करण्यात येत आहे. या दिवशी प्रेमीयुगुल एकमेकांना भेटवस्तू देतात. सूरतमधील तरुणीईमध्येही यावर्षी व्हॅलेन्टाईन डे निमित्त सळसळता उत्साह असल्याचे दिसून येत आहे. व्हॅलेन्टाईन डेला गुलाब देऊन आपल्या प्रेमाची कबुली दिली जाते. तसेच तरुणाई त्यांच्या प्रियकर आणि प्रेयसीला महागडे पुष्पगुच्छ देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. मात्र यावर्षी सूरतमध्ये सोन्याचे गुलाब पुष्प देण्याचा ट्रेंड आला आहे. सूरतच्या एका तरुणीने आपल्या पतीला सोन्याचा मुलामा असलेले दिलचे व्हॅलेन्टाईन गिफ्ट बनवले आहे. परिधी असे त्या तरुमीचे नाव असून दीप असे तिच्या पतीचे नाव आहे.

Valentine Day 2023
तरुणीने बनवलेले खास व्हॅलेन्टाईन गिफ्ट

तरुणीने नवऱ्यासाठी बनवले सोन्याचे दिल : लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला सूरतच्या परिधी या तरुणीने आपल्या पती दीपला खास गिफ्ट देण्याचे ठरवले होते. त्यामुळे तिने लग्नानंतरच्या पहिल्या व्हॅलेंटाईन डेला 108 सोन्याचा मुलामा असलेल्या गुलाबांचा खास हृदयाच्या आकाराचा पुष्पगुच्छ बनवला. हे पाहून तिचा पती दीपलाही खूप आनंद झाला. व्हॅलेन्टाईन डे ला नवरा किंवा प्रियकर भेटवस्तू देतात. मात्र परिधीने आपल्या पतीला खास सरप्राईज देण्याचा निर्णय घेतला आहे. परिधीने बनवलेल्या या खास सोन्याच्या गुलाबपुष्पावर आता अनेक तरुणाईच्या नजरा खिळल्या आहेत.

Valentine Day 2023
तरुणीने बनवलेले खास व्हॅलेन्टाईन गिफ्ट

हिऱयाची अंगठी घेण्यासाठी गेल्यानंतर आवडला गुलाब : आपल्या पतीला खास गिफ्ट घेण्यासाठी गेलेल्या परिधी यांना हिऱ्याची अंगठी घ्यायची होती. मात्र त्यांनी यावेळी सोन्याच्या दुकानात सोनेरी गुलाब दिसला. त्यामुळे त्यांनी लग्नानंतरच्या पहिल्या व्हॅलेंटाईन डेला पतीला हा गोल्डन रोझ बुके गिफ्ट देण्याचे ठरवले. या गुच्छात 108 सोन्याचे प्लेटेड गुलाब आहेत. 108 ही संख्या पती पत्नीत एकता दर्शवत असल्याचे परिधीने यावेळी सांगितले. त्यामुले 108 या संख्येमुळे पती-पत्नीमध्ये प्रेम वाढून ते कायमचे एक होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे हे सरप्राईज देण्याचे ठरवल्याचे परिधीने यावेळी सांगितले.

Valentine Day 2023
तरुणीने बनवलेले खास व्हॅलेन्टाईन गिफ्ट

सोनेरी गुलाबासारखे नाते कायम टिकवण्यासाठी गिफ्ट : परिधीने दिलेल्या गिफ्टमुळे तिचा पती दीप हा फारच खूष असल्याचे दिसून आले. या गिफ्टच्या माध्यमातून पत्नीने आपल्याला एक संदेश दिल्याचे दीपने सांगितले. गुलाब पुष्प काही वेळाने कोमेजून जाते. मात्र सोनेरी गुलाबासारखे त्यांचे नाते कायम टिकून राहण्यासाठी हे गिफ्ट असल्याचे त्याने यावेळी सांगितले.

Valentine Day 2023
तरुणीने बनवलेले खास व्हॅलेन्टाईन गिफ्ट

हृदयाच्या आकाराचे 108 सोन्याचा मुलामा असलेले गुलाब : परिधी आपल्या पतीला व्हॅलेन्टाईन गिप्ट देण्यासाठी एका सोन्याच्या दुकानात गेल्या होत्या. यावेळी सराफा व्यावसाईक शीतल चौक्सी यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यावेळी परिधीने सांगितलेले गिप्ट शीतल यांनी बनवले. याबाबत माहिती देताना शीतल चैक्सी यांनी परिधीला तिच्या पतीसाठी गिफ्ट द्यायचे होते. त्यामुळे आम्ही तिच्या मागणीनुसार हृदयाच्या आकारातील सोन्याचा मुलामा असलेले गुलाब पुष्पाचे गुच्छ बनवल्याची माहिती त्यांनी दिली. आम्ही हा पुष्पगुच्छ हृदयाच्या आकारात तयार केला आहे. या गुलदस्त्यात 108 सोन्याचा मुलामा असलेले गुलाब ठेवावेत, अशी परिधीची इच्छा होती. सोन्याच्या एका गुलाबाची किंमत 1700 रुपये असल्याची माहिती शीतल चोक्सी यांनी दिली. या गुलाब पुष्पाची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याची माहिती शीतल चौक्सी यांनी यावेळी दिली.

हेही वाचा - Ghulam Rasool Balyawi : रामदेव बाबाचे दहशतवादी कनेक्शन, तर बागेश्वर धाम बहुरूपी; जेडीयू नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.