नवी दिल्ली Supriya Sule parliament special session : खासदार सुप्रिया सुळे यांनी सिंचन आणि बँक भ्रष्टाचाराबत तातडीने चौकशी करावी, अशी मागणी संसदेत केली आहे. या चौकशीला आमचं पूर्ण पाठिंबा असेल. नात्यांचा प्रश्न असेल तर संसदेतील प्रत्येक सदस्य माझा भाऊ आहे. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे नॅचरली करप्ट पार्टी म्हटल्याचीही त्यांनी आठवण करून दिली. साठ वर्षात काय केले असे सत्ताधारी म्हणतात. पण, साठ वर्षात आमच्याकडून गेलेले खासदारच सत्ताधाऱ्यांकडे आहेत, असा टोला सुप्रिया सुळे यांनी भाजपाला लगावला.
-
सत्ताधारी पक्षातील खासदारांनी भ्रष्टाचार निर्मूलनाचा मुद्दा मांडला. माझे त्यांना पुर्णपणे समर्थन आहे. कारण पंतप्रधान महाराष्ट्रात आल्यावर म्हणाले होते की, राष्ट्रवादी काँग्रेस ही नॅचरली करप्ट पार्टी आहे. त्यावेळेस सिंचन आणि बॅंक भ्रष्टाचाराचा मुद्दा त्यांनी मांडला होता. माझी…
— Supriya Sule (@supriya_sule) September 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">सत्ताधारी पक्षातील खासदारांनी भ्रष्टाचार निर्मूलनाचा मुद्दा मांडला. माझे त्यांना पुर्णपणे समर्थन आहे. कारण पंतप्रधान महाराष्ट्रात आल्यावर म्हणाले होते की, राष्ट्रवादी काँग्रेस ही नॅचरली करप्ट पार्टी आहे. त्यावेळेस सिंचन आणि बॅंक भ्रष्टाचाराचा मुद्दा त्यांनी मांडला होता. माझी…
— Supriya Sule (@supriya_sule) September 18, 2023सत्ताधारी पक्षातील खासदारांनी भ्रष्टाचार निर्मूलनाचा मुद्दा मांडला. माझे त्यांना पुर्णपणे समर्थन आहे. कारण पंतप्रधान महाराष्ट्रात आल्यावर म्हणाले होते की, राष्ट्रवादी काँग्रेस ही नॅचरली करप्ट पार्टी आहे. त्यावेळेस सिंचन आणि बॅंक भ्रष्टाचाराचा मुद्दा त्यांनी मांडला होता. माझी…
— Supriya Sule (@supriya_sule) September 18, 2023
महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून भाजपानं काँग्रेसवर टीका केली होती. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सोमवारी काँग्रेसचा बचाव केलाय. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, पहिल्या महिला पंतप्रधान, राष्ट्रपती काँग्रेसच्या होत्या. तसा कायदाही त्यांनीच आणला होता. परंतु संख्याबळाच्या कमतरतेमुळं विधेयक संसदेत मंजूर होऊ शकलं नाही, असं त्या म्हणाल्या. संसदेत चर्चेत भाग घेताना सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला आरक्षण विधेयक आणण्याची विनंती केली, राष्ट्रावादी काँग्रेस पक्ष भाजपाला पूर्ण पाठिंबा देईल असं आश्वासन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलंय.
बहुतेक महिला खासदार महिला आरक्षण विधेयकाबाबत विचारत आहेत. इथे बसलेल्या प्रत्येकाला याची चिंता आहे" - सुप्रिया सुळे, खासदार
पहिल महिला विधेयक काँग्रेसनं मांडलं : अनेक दशके सत्तेत असूनही महिला आरक्षणासाठी काँग्रेसनं काय केलं, या प्रश्नावर भाजपाचे खासदार राकेश सिंह यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना सुळे म्हणाल्या, "भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील, काँग्रेसच्या होत्या, देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी काँग्रेसच्या होत्या, पहिल्या महिला स्पीकर मीरा कुमार काँग्रेसच्या होत्या, असं त्यांनी उत्तर देताना म्हटलंय. "मला आणखी सांगायची आहे. भारतातंल पहिल महिला विधेयक काँग्रेसनं संसदेत मांडलं होतं, मात्र, संसदेतील संख्याबळाच्या अभावामुळं ते मंजूर होऊ शकलं नाही, असं त्यांनी सांगितलं.
मी भाग्यवान आहे की बारामती लोकसभा मतदारसंघातील व महाराष्ट्रातील जनतेने मला या संसदेतील सदस्य होण्याची संधी दिली. त्यामुळे नियमांच्या अधीन राहून मी माझे काम करत राहीन असा विश्वास आहे-सुप्रिया सुळे, खासदार
महिलांना आरक्षण देणार महाराष्ट्र पहिलं राज्य : प्रत्येक पंचायतीमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण दिल्याबद्दल सुळे यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, थता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं देखील कौतुक केलंय. "मला सांगायला खूप अभिमान वाटतो की महिलांना 33 टक्के आरक्षण देणार महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे. नंतर त्यात वाढ करून आम्ही 50 टक्के केल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.
हेही वाचा -
- Cabinet Meeting : पंतप्रधान मोदींनी बोलावली मंत्रिमंडळाची बैठक, काय घेण्यात येणार निर्णय?
- Maharashtra Political Crisis : अपात्र आमदारांच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना फटकारलं, 'हे' दिले महत्त्वाचे निर्देश
- Guinness World Records : सॅक्सोफोन वाजवून गर्भवती महिलेनं कोरलं गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव