अहमदाबाद (गुजरात): Godhra carnage: गोध्रा हत्याकांडातील दोषीला 17 वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. फारुखने जळत्या ट्रेनमधील लोकांवर दगडफेक केली. या घटनेत जवळपास 59 जणांचा मृत्यू झाला होता. जळत्या ट्रेनवर दगडफेक केल्याप्रकरणी फारुखला दोषी ठरवण्यात आले होते. गेल्या 17 वर्षांपासून तो तुरुंगात होता. SC grants bail to Godhra carnage convict
27 फेब्रुवारी 2002 रोजी हिंसक जमावाने गोध्रा स्थानकावर साबरमती एक्सप्रेस ट्रेनच्या S-6 डब्याला आग लावली. या घटनेत जवळपास 59 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 2002 मध्ये संपूर्ण गुजरातमध्ये भीषण दंगली उसळल्या होत्या. जळत्या ट्रेनवर दगडफेक केल्याप्रकरणी फारुखला दोषी ठरवण्यात आले होते. फारुखने ट्रेनवर दगडफेक केली. त्यामुळे लोक जळत्या ट्रेनमधून खाली उतरू शकले नाहीत आणि मरण पावले. सर्वोच्च न्यायालय ख्रिसमसच्या सुट्ट्यांनंतर उर्वरित 17 दोषींच्या अपीलांवर जानेवारीत सुनावणी करणार आहे.
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने फारुख या आरोपीच्या जामिनावर सुनावणी घेतली. त्याला आतापर्यंतचा कालावधी पाहता जामीन मंजूर करण्यात आला आहे. अनेक दोषींच्या शिक्षेविरोधातील अपील सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. फारुख आणि इतर अनेकांना साबरमती एक्स्प्रेसच्या डब्यावर दगडफेक केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते.
आज सर्वोच्च न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान फारुखच्या जामीन अर्जाला विरोध करताना गुजरात सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, त्याच्यावर केवळ दगडफेकीचा आरोप नाही, तर हा एक प्राणघातक गुन्हा आहे. कारण या घटनेदरम्यान लोकांना दगडफेक करून जळत्या ट्रेनमधून बाहेर पडू दिले नाही. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, दोषी फारुख 2004 पासून तुरुंगात आहे. गेल्या 17 वर्षांपासून तो तुरुंगात आहे. त्यामुळे तो तुरुंगातून जामिनावर सुटला आहे.