नवी दिल्ली - माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या हत्येप्रकरणी सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) महत्त्वाचा निर्णय दिला आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या नलिनी आणि आरपी रविचंद्रन यांच्यासह सहा आरोपींची सुटका करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ( Rajiv Gandhi Assassination Case )
न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय : राजीव गांधी यांच्या हत्येनंतर जन्मठेपेची शिक्षा (Life sentence) भोगत असलेल्या नलिनी (Nalini Sriharan) आणि आरपी रविचंद्रन यांच्यासह सहा आरोपींची सुटका करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेने या संदर्भात माहिती दिली आहे. मद्रास उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर सध्या पॅरोलवर बाहेर असलेल्या नलिनी यांनी तुरुंगातून लवकर सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने आता महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
राजीव गांधी यांच्यावर आत्मघातकी हल्ला : शुक्रवारी मोठा निकाल देत सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येतील सहाही दोषींची सुटका करण्याचे आदेश दिले. या दोषींमध्ये राजीव गांधी यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या नलिनी आणि आरपी रविचंद्रन यांचाही समावेश आहे. 21 मे 1991 रोजी तामिळनाडूमध्ये एका निवडणूक रॅलीदरम्यान तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर आत्मघातकी हल्ला झाला होता. या हल्ल्यात माजी पंतप्रधानांचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्याच्या तपासात सात जण दोषी आढळले. दोषींपैकी एक पेरारिवलनला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.