1992 साली बाबरी मशीद पडल्यानंतर दाखल झालेली सर्व प्रकरणे सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे बंद केली Supreme Court closes all the proceedings on babri आहेत. बाबरी मशीद पडल्यानंतर त्यासंदर्भात हिंदू मुस्लिम दोन्ही समुदायांकडून काही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. त्यासंदर्भातील महत्त्वाचे निकाल देऊन झाले आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाने suprime court याबाबतचे संपूर्ण कामकाज बंद केल्याचे स्पष्ट केले आहे.
अयोध्या प्रकरणी निकाल याआधी अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंर 2019 रोजी आपला निकाल जाहीर केला होता. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने वादग्रस्त जागा रामलल्लाचीच असल्याचे स्पष्ट केले होते. तर मुस्लीम पक्षकारांना अयोध्येत ५ एकर पर्यायी जागा देण्याचे आदेश देण्यात आले होते. ही पर्यायी जागा केंद्र किंवा राज्य सरकार कोणीही देऊ शकते, असे न्यायालयाने म्हटले होते. या निकालानुसार वादग्रस्त असलेली २.७७ एकर जागा ही केंद्र सरकार नियंत्रित ट्रस्टला मिळणार असल्याचे न्यायालयाने या निकालात स्पष्ट केले होते.
अयोध्या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निकालात पुढील प्रमाणे होते प्रमुख मुद्दे
- ट्र्स्टच्या कामकाजासाठी सरकारने मार्गदर्शन करावे, त्यात मंदिर बांधण्याचाही समावेश राहिल.
- या ट्रस्टला वादग्रस्त वास्तूच्या आतिल आणि बाहेरील ढाच्याची मालकी या ट्रस्टला देण्यात येईल.
- सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येत ५ एकर जागा देण्याचे निर्देश.
- ही जागा केंद्र किंवा राज्य सरकारकडून देण्यात येणार
- मुस्लीम पक्षकारांना अयोध्येत पर्यायी जागा मिळेल
- 1857 पूर्वी वादग्रस्त भूमीवर कोणाची मालकी होती, याबाबत मुस्लीम पक्षकारांकडून पुरावे सादर करण्यात आले नाहीत.
- वादग्रस्त जागेची मालकी आणि केवळ नमाज पठणाचे पुरावे नाहीत.
- प्रत्येक शुक्रवारी मशीद परिसरात मुस्लीम समाजबांधव नमाज पठण करत होते, याचे पुरावे उपलब्ध
- चौथरा व सीतेची रसोई मान्य
- अयोध्येत रामाचा जन्म झाला ही हिंदूची आस्था
- जमिनीच्या मालकीवर मार्गदर्शक तत्वानुसार निर्णय घेतला जाईल
- वादग्रस्त जागेवर हिंदू आणि मुस्लीम दोन्ही धर्माचे लोक पूजा करत होते.
- अयोध्येत रामाचा जन्म झाला यावर कोणताही वाद नाही
- मशिदीच्या पायावरून त्या ठिकाणी हिंदू मंदिर होते हे स्पष्ट होत नाही, पुरातत्व विभागाच्या अहवालानुसार
- पुरातत्व विभागाच्या अहवालाकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
- मशीद ज्या ठिकाणी बांधली त्या ठिकाणच्या पायाची रचना दुसऱ्या पद्धतीची, त्यावरच मशीद उभारली.
- मशिदीचा पाया इस्लामिक पद्धतीचा नव्हता.., मशीद रिकाम्या जागेवर बांधलेली नाही.
- भाविकांचीश्रद्धा आणि भावना विचारता घेणे महत्वाचे, यासाठी न्यायालय समतोल राखणार