ETV Bharat / bharat

Supreme court : सर्वोच्च न्यायालयाने पैलवानांची केस केली बंद; 'हा' दाखवला नवा मार्ग - पैलवानांची केस बंद करू

सर्वोच्च न्यायालयाने महिला पैलवानांनी दाखल केलेली याचिका रद्द केली आहे. पोलीस प्राथमिक तक्रार दाखल करत नसल्याची याचिका महिला पैलवानांनी दाखल केली होती.

Supreme court News
Supreme court News
author img

By

Published : May 4, 2023, 4:12 PM IST

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने तीन महिला पैलवानांनी दाखल केलेली याचिका रद्द केली आहे. दिल्ली पोलिसांनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण यांच्याविरुद्धात प्राथमिक तक्रार दाखल केली आहे. यामुळे पैलवानांनी दाखल केलेली याचिका रद्द करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती पीएस नरसिंम्हा आणि न्यायमूर्ती जेबी पारदीवाला यांच्या पीठाने सांगितलं की, दाखल केलेल्या याचिकेत बृजभूषण शरण यांच्याविरुद्धात प्राथमिक तक्रार दाखल केली जात नाही,अशी तक्रार करण्यात आली होती. पण आता ही तक्रार दाखल करण्यात आल्याने या याचिकेचा उद्देश पूर्ण झाला आहे.

याचिक रद्द : दरम्यान याचिकाकर्त्यांची अजून काही तक्रार असेल तर ते कलम 482 सीआरपीसीच्या अंतर्गत दिल्ली न्यायालयात आव्हान करू शकतात असेही न्यायमूर्तींच्या पीठाने म्हटले आहे. महिला पैलवानांनी बृजभुषण यांच्यावर केलेल्या आरोप प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. या प्रकणात सर्वोच्च न्यायालय दखल घेईपर्यंत पोलिसांनी केलेलं वर्तन बघता न्यायालयाने या चौकशीवर लक्ष्य द्यावे, अशी विनंती याचिकाकर्तांचे वरिष्ठ वकील नरेंद्र हुड्डा यांनी केली होती. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका रद्द केली आहे. याचिक रद्द करताना न्यायालयाने म्हटले की, न्याय दंडाधिकारी या कलम 482 सीआरपीसी अंतर्गत दिल्ली उच्च न्यायालयात याविषयी आव्हान देऊ शकतात.

दिल्ली उच्च न्यायालयात जावे : नरेंद्र हुड्डा यांनी सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली की, दिल्ली पोलिसांचे वर्तन बघता 'मी विनंती करतो की, न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्त्वखाली करण्यात यावी'. न्यायालयाने सुनावणी रद्द केली तर दिल्ली पोलीस परत त्याचप्रकारे वर्तन करतील. यावर बोलताना मुख्य न्यायाधीश म्हणाले की, आम्ही फक्त म्हणालो की, आम्ही या स्तरावरील कारवाई बंद करत आहोत. स्वत: ला मत मांडणीपर्यंत मर्यादित ठेवत आहोत. या प्रकरणाची चौकशी देखरेखीखाली करण्यात यावी या लायकीचे नाही, असं आम्ही म्हटलं नाही. जर काही समस्या किंवा काही दुसरी तक्रार असेल तर तुम्ही न्यायदंडाधिकारीकडे किंवा दिल्ली उच्च न्यायालयात जावे असही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा : तुमच्या भावनांचा आदर करून एक ते दोन दिवसांत अंतिम निर्णय घेणार, पवारांचा कार्यकर्त्यांना शब्द

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.