ETV Bharat / bharat

केरळमधल्या सुलेमान यांनी उभारलं बोन्साय झाडांचं साम्राज्य - कन्नूर केरळ लेटेस्ट न्यूज

केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील कुप्पम तलिपारम्बामधील हे घर लहान झाडांनी भरलेल्या स्वर्गासारखं दिसतं. हे बोन्सायच्या 400 हून अधिक प्रकारच्या झाडांचं घर आहे, हे सुलेमान यांचं घर आहे. इथल्या परिसरात सगळीकडं लहान-लहान कुंड्यांमध्ये ही झाडं लावलीयेत. घराचं छत असो वा घरासमोरचं अंगण, सुलेमान यांचं घर आणि त्याच्या अंतःकरणातही या बोन्साय झाडांचं साम्राज्य आहे.

केरळमधल्या सुलेमान यांचं बोन्सायचं झाडांचं साम्राज्य

author img

By

Published : Jan 21, 2021, 6:03 AM IST

कन्नूर (केरळ) - केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील कुप्पम तलिपारम्बामधील हे घर लहान झाडांनी भरलेल्या स्वर्गासारखं दिसतं. हे बोन्सायच्या 400 हून अधिक प्रकारच्या झाडांचं घर आहे, हे सुलेमान यांचं घर आहे. इथल्या परिसरात सगळीकडं लहान-लहान कुंड्यांमध्ये ही झाडं लावलीयेत. घराचं छत असो वा घरासमोरचं अंगण, सुलेमान यांचं घर आणि त्याच्या अंतःकरणातही या बोन्साय झाडांचं साम्राज्य आहे.

'बोन्साय' शब्दाचा अर्थ

जपानमध्ये 'बोन्साय' शब्दाचा अर्थ एका लहान कुंडीत वाढणारी वनस्पती असा आहे. बोन्साय हे पूर्णपणे वाढलेल्या झाडांप्रमाणेच त्यांचं लहान रूप असतं. बोन्सायचा उपयोग झाडांशी संबंधित आवड जोपासण्यासाठी आणि बाह्य सौंदर्य वाढविण्यासाठी केला जातो. तथापि, बऱ्याच लोकांना आवडत असूनही, बोन्सायच्या झाडाच्या लागवडीबद्दल बरेचसे समज आणि गैरसमज आहेत. बरेच लोक असा विचार करतात की, बोन्साय हे एक असं झाड आहे, जे कमी सूर्यप्रकाश, पाणी आणि कंपोस्टशिवाय लहान आकारात स्वतःला मर्यादित करतं. त्याची वाढ त्याच्या नैसर्गिक वाढीच्या प्रक्रियेत रोखून केली जाते. हा एक पूर्णपणे गैरसमज आहे. खरं तर, बोन्साय वृक्ष हे मोठ्या झाडाचीच परिपक्वता आणि परिपूर्णतेसह बनलेली दमदार, निरोगी आणि लहान आवृत्ती आहे. बोन्सायमध्ये त्या-त्या झाडाची सर्व वैशिष्ट्यंही असतात.

केरळमधल्या सुलेमान यांचं बोन्साय झाडांचं साम्राज्य

हेही वाचा - इंडोनेशियाचा निळा भात आता अहमदनगरच्या अकोले तालुक्यात, शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग

सुलेमान यांच्याकडं आहेत ही बोन्साय

सुलेमान यांच्याकडं अनेक जातींच्या झाडांच्या बोन्सायचा मोठा संग्रह आहे. ज्यामध्ये पूर्ण उमलणाऱ्या फुलझाडांचाही समावेश आहे. शिवाय, लहान-लहान फळझाडं, चिंच, वड आणि इतर अनेक प्रकारची फळझाडंही उपलब्ध आहेत. या सर्व झाडांची लहान कुंड्यांमध्ये लागवड केली जाते. सुलेमान यांच्या संग्रहात 400 हून अधिक बोन्साय झाडं आहेत.

इथं वडापासून अशी बोन्सायची अनेक झाडे आहेत, ज्यांचं वय 15, 25 आणि 65 वर्षंही आहे. वटवृक्षाची बोन्साय ज्यांचं वय 65 आणि 32 वर्ष आहे, तीही येथे आहेत. तसंच इथं 10 वर्षांचं अंजीराचे झाडही आहे. याला छोटी-छोटी फळं लागली आहेत. 25 वर्ष वयाचं चिंचेचं झाड सुलेमान यांच्या घराच्या आकर्षणाचं मुख्य केंद्र आहे. इथल्या 5 वर्षांच्या वटवृक्षाची किंमत सर्वांत कमी 2000 रुपये आहे. सुलेमान यांनी कृषी फलोत्पादनाचं शिक्षण घेतल्यानंतर बोन्सायच्या झाडांची लागवड हाती घेतली आहे.

सुलेमान गेली 25 वर्ष या क्षेत्रात आहेत. कन्नूर अ‌ॅग्री हॉर्टिकल्चरल सोसायटीकडून दिला जाणारा 'प्लांट ऑफ द इयर' पुरस्कार सलग 7 वर्ष त्यांनी जिंकला आहे. याशिवाय, इतर शेतकर्‍यांमधील सर्वोत्कृष्ट बोन्साय शेतकरी म्हणूनही त्यांना गौरवण्यात आलंय. मूळचे वडकाराचे असलेले प्रवीणकुमार आणि सुलेमान हे दोघे मिळून बोन्साय वृक्षांची लागवड व पालनपोषण करत आहेत.

अशी करा बोन्सायची लागवड

ज्या लोकांना बोन्सायची झाडांची आवड आहे, ते चिंच, नेल्ली, एडेनिअम आणि विविध प्रकारच्या वडासारख्या लहान पाने असलेल्या झाडांपासून सुरुवात करू शकतात. त्यांची काळजी घेणं सोपंय. मोठ्या कुंडीत सुमारे दोन वर्ष एक लहान झाड वाढवल्यानंतर, त्याची मुळं आणि फांद्या व्यवस्थित ट्रिम केल्या पाहिजेत. ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा करून, त्याचं लहान स्वरूप कायम ठेवता येतं. जानेवारी आणि फेब्रुवारी हे महिने लहान कुंड्यांमध्ये वाढणार्‍या वनस्पती लावण्यासाठी योग्य आहेत. बोन्साय वाढवण्यासाठी, लहान कुंडीमध्ये माती, शेणखत आणि नदीतल्या वाळूचं मिश्रण असावं. ते 1: 1: 1 च्या प्रमाणात म्हणजे समान प्रमाणात असलं पाहिजे. केवळ एका दिवसात किंवा एका महिन्यात एखाद्या झाडाला बोन्साय करता येत नाही. बोन्सायच्या बागकाम कलेसाठी वेळ, संयम, सौंदर्य आणि कौशल्य असणं आवश्यक आहे. त्यांची काळजी घेत आपण बोन्सायने भरलेली सुंदर बाग बनवू शकतो.

हेही वाचा - सर्व पक्ष व धर्म यांच्यापलीकडे राष्ट्रमंदिरासाठी अभियान सुरू - साध्वी ऋतंभरा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.