ETV Bharat / bharat

सुखदेव सिंह गोगामेडी हत्याकांडातील सूत्रधाराचं नाव समोर, पोलीस चौकशीत अनेक खुलासे - सुखदेव सिंह गोगामेडी सूत्रधार

Sukhdev Singh Gogamedi : राजस्थानमधील सुखदेव सिंह गोगामेडी हत्याकांडातील ३ आरोपींना चंदीगडमधून अटक करण्यात आली आहे. या तिघांचा परदेशात पळून जाण्याचा प्लॅन होता. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. त्यांच्या चौकशीदरम्यान, हत्याप्रकरणी अनेक खुलासे झाले आहेत.

Sukhdev Singh Gogamedi
Sukhdev Singh Gogamedi
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 10, 2023, 5:22 PM IST

पाहा व्हिडिओ

नवी दिल्ली Sukhdev Singh Gogamedi : राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. दिल्ली पोलिसांनी हत्येच्या तीन आरोपींना चंदीगडमधून अटक केली. या हत्येचा सूत्रधार आणि राजस्थानचा कुख्यात गुंड रोहित गोदरा सध्या परदेशात आहे. त्यानं त्याचा साथीदार वीरेंद्र चारन याच्याकडे शूटरची व्यवस्था करण्याची जबाबदारी दिली होती.

सुखदेव यांच्याशी शत्रूत्व होतं : अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक रोहित राठोड यानं चौकशीदरम्यान सांगितलं की, तो वीरेंद्र चारनसह राजस्थानच्या तुरुंगात होता. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होता. या प्रकरणी सुखदेव त्याच्याविरुद्ध बयाण देत होते. यामुळे तो सुखदेव सिंह यांच्यावर रागावला होता. याचा फायदा घेत रोहितनं वीरेंद्र चारनला सुखदेव सिंह यांचा खून करण्याची सुपारी दिली.

विदेशात पळून जाण्याची योजना होती : हत्येपूर्वी शूटर नितीन आणि रोहितनं प्रत्येकी ५० हजार रुपये घेतल्याचं समोर आलं आहे. चंदीगडनंतर या दोघांनी गोव्यात जाण्याची योजना आखली होती. तेथून ते दक्षिण भारतात लपून बसतील आणि नंतर पासपोर्टची व्यवस्था करून विदेशात पळून जातील, असा त्यांचा प्लॅन होता. मात्र, त्यापूर्वीच ते पकडले गेले. आरोपींनी सांगितलं की, त्यांनी सुमारे आठवडाभरापूर्वी हत्येचा कट रचला होता. त्यापूर्वी नवीन शेखावतनं रेकी केली होती. नवीन शेखावत यानं भीतीपोटी घटना थांबवण्याचा प्रयत्न केला होता, ज्यामुळे त्यालाही गोळी लागली.

कोण आहे नितीन फौजी : या प्रकरणातील दुसरा आरोपी नितीन फौजीविरुद्ध हरियाणातील महेंद्रगडमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. तुरुंगात असताना तो वीरेंद्र चारनच्या संपर्कात आला. वीरेंद्र चारननं नितीनला परदेशात स्थायिक होण्याचं आश्वासन दिलं होतं. हत्याकांडाच्या आधी आणि नंतरही वीरेंद्र चारननं या दोन्ही शूटर्सना जयपूरमध्ये शस्त्रं पाठवली होती. नितीन आणि रोहित यांनी हत्याकांडानंतर जयपूरजवळील हॉटेलजवळ शस्त्रं लपवून ठेवल्याचं सांगितलं.

पळून जाण्यासाठी शर्थीचे प्रयत्न : गोगामेडी यांच्या हत्येनंतर त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून पोलीस आणि प्रशासनाला ७२ तासांचा अल्टिमेटम दिला होता, हे विशेष. मात्र, त्यापूर्वीच नितीन फौजी आणि रोहित राठोड हे दोन्ही शूटर पकडले गेले. खून केल्यानंतर दोन्ही आरोपी पोलिसांपासून पळून जाण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. पोलिसांना चकमा देण्यासाठी ते सतत एका शहरातून दुसऱ्या शहरात फिरत होते. आधी तो जयपूरहून ट्रेननं हरियाणातील हिस्सारला पोहोचले. तिथे ते तिसरा आरोपी उधम याला भेटले. तेथून ते तिघे मनालीमार्गे चंदीगडला पोहोचले. तिथे पोलिसांनी त्यांना पकडलं.

हे वाचलंत का :

  1. करणी सेनेच्या अध्यक्षाची घरात घुसून हत्या, पाहा थरारक Video
  2. गोगामेडी हत्याकांडानंतर राजस्थान पेटलं, अनेक ठिकाणी तोडफोड; केंद्राकडून अतिरिक्त फौजफाटा मागवला
  3. सुखदेव सिंह गोगामेडींच्या हत्या करणाऱ्या दोन शूटर्सला चंदीगडमधून अटक, राजस्थानसह दिल्ली पोलिसांची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.