दावणगेरे/शिवमोग्गा (कर्नाटक) : आफ्रिकेतील सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्करी दलांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे संपूर्ण देशात दहशत निर्माण झाली आहे. नागरिकांच्या रहिवासी भागात गोळीबार होत आहे. यामध्ये अनेक लोकांचा आपला जीव गमवावा लागला असून अनेक लोक जखमी झाले आहेत. कर्नाटकातील एकूण 31 लोक सुदानच्या अल्पाशेर शहरात अडकले असून त्यात दावणगेरे जिल्ह्यातील 5 लोकांचा समावेश आहे. त्यांनी भारत सरकारला त्यांचा फोटो आणि व्हिडिओ पाठवून मदतीची याचना केली आहे.
कामाच्या शोधात सुदानला गेले होते : सुदानमध्ये भारतीय नागरिक राहत असलेल्या घरांवर गोळीबार करण्यात आला आहे. परिस्थिती बिघडल्याने खाण्यापिण्याची टंचाईही निर्माण झाली आहे. येथे कर्नाटकातील 31 लोकं अडकले असून पैकी शिमोगातील 7, दावणगेरे जिल्ह्यातील चन्नागिरीचे 5 आणि म्हैसूर जिल्ह्यातील हुनसूरचे 19 लोकं आहेत. यातील काही मजूर कामाच्या शोधात सुदानला गेले होते. सततच्या गोळीबारामुळे सर्व घाबरले आहेत. ज्या इमारतीत राहण्याची सोय आहे त्या इमारतीवरही गोळीबार करण्यात आला असून त्यामुळे लोक भयभीत झाले असून सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. भारत सरकारने आम्हाला येथून बाहेर पडण्यासाठी मदत करावी, असे येथे अडकलेल्या लोकांचे म्हणणे आहे. सुदानमध्ये अडकलेल्या 31 कन्नड लोकांपैकी बहुतेक लोक हर्बल औषध विकण्यासाठी गेले होते अशी माहिती आहे.
खाण्यापिण्याची टंचाई निर्माण झाली आहे : मिळालेल्या माहितीनुसार, शिमोगाच्या हक्कीपिक्की समुदायाचे 7 लोक सुदानमध्ये अडकले आहेत. ते म्हणाले की, आम्ही कर्नाटकचे रहिवासी आहोत. आम्ही अल्फाशर सिटी, सुदान येथे राहतो. आम्ही 10 दिवसांपूर्वी येथे आलो होतो. गेल्या तीन दिवसांपासून येथे गोळीबार सुरू आहे. आमच्या घराभोवती गोळीबार सुरू आहे आणि आम्हाला बॉम्बचे आवाजही ऐकू येत आहेत. विमानतळ उद्ध्वस्त झाले आहे. मोठी शहरेही उद्ध्वस्त झाली आहेत. पीडितांनी व्हिडीओमध्ये त्यांची दुःखद कहाणी सांगितली आहे. ते म्हणाले की, येथे जेवण, नाष्टा आणि पिण्याच्या पाण्याची देखील सोय नाही.
सरकारकडून हेल्पलाईन जारी : सुदानी सैन्य आणि निमलष्करी दले यांच्यातील सध्याच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने माहिती आणि मदत देण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. तेथे अडकलेले भारतीय खालील क्रमांकांवर संपर्क साधू शकतात. 1800 11 8797 (टोल फ्री) +91-11-23012113; +91-11-23014104; +91-11-23017905; मोबाइल: +91 9968291988, ईमेल: situationroom@mea.gov.in
हे ही वाचा : Mehul Choksi Wins: भारताला मोठा झटका, मेहुल चोक्सीला भारतात आणण्याची वाट बिकट, कोर्टाकडून चोक्सीला दिलासा