नरसीपट्टणम: अनकापल्ली जिल्ह्यातील कामिरेड्डी दुर्गाप्रसाद वय ३५ याने सोमवारी रात्री गळफास लावून घेतला. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. याआधी दुर्गाप्रसाद यांनी सेल्फी व्हिडीओ तयार केला होता. त्यामध्ये 'नरसिपट्टणममधील एक कपड्याचा दुकानदार माझ्या पत्नीला घेऊन गेला आहे. ती त्याच्यासोबत आहे. पण तो ती कुठे आहे हे माहित नसल्याचं नाटक करतोय. मी या कारणास्तव माझे जीवन संपवत आहे. दुकानात काम करणाऱ्या तरुणाला पकडले तर सर्व काही बाहेर येईल. यापूर्वी मी पोलिसांकडे केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात होते. पाच महिन्यांपासून हे सुरू आहे. परंतु कोणीही याकडे लक्ष देत नाही. तुम्हीच आता न्याय द्यावा, साहेब,' असे आवाहन या व्हिडिओत त्याने केले आहे.
या व्हिडिओला उत्तर देताना सीआय श्रीनिवास राव म्हणाले की, जेव्हा त्यांच्या पत्नीने दुर्गाप्रसाद यांच्या विरोधात तक्रार केली तेव्हा त्यांचे पूर्वी समुपदेशन करण्यात आले होते. रागातून त्यांनी पोलिसांवर आरोप केले असावेत. दुर्गा प्रसादचे दहा वर्षांपूर्वी एका तरुणीशी लग्न झाले होते. तिने त्याला नंतर सोडून दिले. नंतर त्याने कपड्याच्या दुकानात काम करणाऱ्या अनाथ मुलीशी लग्न केले. गेल्या एप्रिलमध्ये ती पडेरू येथील भावाच्या घरी गेली आणि परत आलीच नाही. एसएसआय धनंजय यांनी सांगितले की, मयताची आई सत्यवती यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, आपल्या मुलाने दारूच्या सवयीमुळे आणि पत्नी सोडून जाण्याच्या त्रासामुळे आत्महत्या केली असावी.
हेही वाचा - gang rape with minor football player: रांचीमध्ये अल्पवयीन फुटबॉलपटूवर सामूहिक बलात्कार