ETV Bharat / bharat

Healthy Diet : निरोगी आरोग्यासाठी आहारात बटाट्यांचा समावेश करा

पेनिंग्टन बायोमेडिकल रिसर्च सेंटरच्या नवीन संशोधनानुसार (Study suggests) असे म्हटले आहे की, बटाटे आरोग्यासाठी उपयुक्त असा (potatoes can be part of healthy diet) अन्नपदार्थ आहे. ते मुख्य पोषक तत्वांनी भरलेले आहेत. असे वृत्त जर्नल ऑफ मेडिसिनल फूडमध्ये प्रकाशित झाले आहे. Healthy Diet

Healthy Diet
आहारात बटाट्यांचा समावेश करा
author img

By

Published : Nov 20, 2022, 5:22 PM IST

वॉशिंग्टन [यूएस]: बटाट्यांचा समावेश न खाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या यादीत केला जातो. विशेषत: इन्सुलिन प्रतिरोधक असलेल्या लोकांसाठी बटाटे प्रतिबंधक सांगितले जातात. कारण वजन वाढवण्यास आणि टाइप 2 मधुमेहाचा उच्च धोका वाढवण्यास बटाट्यांना कारणीभूत ठरवले जाते. पेनिंग्टन बायोमेडिकल रिसर्च सेंटरचे नवीन संशोधन आणि जर्नल ऑफ मेडिसिनल फूडमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार (Study suggests) असे म्हणटले आहे की, बटाटे खाल्ल्याने कुठलाही धोका होत नाही. उलट ते मुख्य पोषक तत्वांनी भरलेले असतात आणि आरोग्यासाठी उपयुक्त (potatoes can be part of healthy diet) असतात. Healthy Diet

पेनिंग्टन बायोमेडिकलमधील सहाय्यक प्राध्यापक, डॉ. कॅन्डिडा रेबेलो यांनी या अभ्यासाचे सह-अन्वेषक म्हणून काम केले, ज्यामध्ये बटाट्यांसह आहाराचा मुख्य आरोग्य उपायांवर कसा परिणाम होतो हे तपासले. रेबेलो हे एक आहारतज्ञ देखील आहेत. ' लोकांच्या समजुतीप्रमाणे बटाटे रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर नकारात्मक परिणाम करत नाहीत. खरे तर आमच्या अभ्यासात सहभागी झालेल्या व्यक्तींचे वजन बटाटे खाल्ल्याने कमी झाले. मात्र काही लोक, कॅलरीकडे दुर्लक्ष करून पोट भरण्यासाठी समान कॅलरीचे अन्न खातात.

अभ्यासात 18 ते 60 वयोगटातील 36 सहभागींचा समावेश होता. ज्यांचे वजन जास्त होते, लठ्ठपणा होता किंवा इन्सुलिन वाढलेले होते. इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे अशी आरोग्य स्थिती ज्यामध्ये शरीराच्या पेशी इंसुलिनला चांगला प्रतिसाद देत नाहीत आणि ग्लुकोज ऊर्जा बनवण्यासाठी पेशींमध्ये प्रवेश करत नाही. इन्सुलिनचा तयार न होण्याचा संबंध लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल आणि टाइप 2 मधुमेहाशी संबंधित आहे.

अभ्यासात सहभागींना बीन्स, वाटाणे आणि मांस किंवा मासे, किंवा मांस किंवा मासे असलेले पांढरे बटाटे यासह मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेल्या सामान्य पदार्थांचे अचूकपणे नियंत्रित आहार दिले गेले. दोन्ही आहारात फळे आणि भाजीपाला सामग्री जास्त होती आणि साधारणतः 40% मांसाहाराची जागा बीन्स आणि मटार किंवा बटाटे यांनी घेतली. मागील अभ्यासातून असे दिसून आले आहे की, बीन्स आणि मटार खाल्ल्याने, नवीन निदान झालेल्या आणि टाइप 2 मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी सुधारते.

बटाट्यांच्या आहारातील फायबर घटक वाढवण्यासाठी, ते सालासह उकळले गेले आणि नंतर 12 ते 24 तासांच्या दरम्यान थंड केले गेले. बटाटे मुख्य लंच आणि डिनरमध्ये समाविष्ट केले गेले, जसे की शेफर्ड पाई आणि क्रीमी कोळंबी आणि बटाटे, आणि मॅश केलेले बटाटे, ओव्हन-भाजलेले बटाट्याचे वेज, बटाटा सॅलड आणि दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात स्कॅलॉप केलेले बटाटे यांसारखे पदार्थ त्यात सहभागी होते.

'आम्ही बटाटे अशा प्रकारे तयार केले की , त्यांच्यातील फायबरचे प्रमाण जास्तीत जास्त वाढेल. जेव्हा आम्ही बटाट्याच्या आहाराची तुलना बीन्स आणि मटारच्या आहाराशी केली. तेव्हा आम्हाला ते आरोग्याच्या फायद्यांच्या बाबतीत समान असल्याचे आढळले, असे रेबेलो म्हणाले. 'लोक सामान्यत: त्यांना आवडत नसलेला किंवा पुरेसा वैविध्यपूर्ण नसलेला आहार घेत नाहीत. जेवणाच्या योजनांमध्ये विविध प्रकारचे पदार्थ दिले जातात आणि आम्ही हे दाखवून दिले की, निरोगी खाण्याच्या योजनेत, निरोगी खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींसाठी विविध पर्याय असू शकतात. शिवाय, आहारात समाविष्ट करण्यासाठी बटाटे ही एक स्वस्त भाजी आहे.'

पेनिंग्टन बायोमेडिकल रिसर्च सेंटरचे कार्यकारी संचालक, पीएचडी आणि अभ्यासाचे प्रमुख अन्वेषक जॉन किरवान म्हणाले की, 'लठ्ठपणा हा एक आश्चर्यकारकपणे गुंतागुंतीचा आजार आहे. याचा अभ्यास पेनिंग्टन बायोमेडिकल तीन वेगवेगळ्या आघाड्यांवर करत आहे. संशोधनात लठ्ठपणाबाबत आपल्या शरीराची प्रतिक्रिया कशी आणि का दिल्या जाते, हे बघितले जाते. Healthy Diet

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.