ETV Bharat / bharat

Kanker Road Accident: विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या रिक्षाचा भीषण अपघात.. ट्रकच्या धडकेत ७ विद्यार्थी जागीच ठार..

छत्तीसगडच्या कांकेर येथील कोरेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिक्षा आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. येथे शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या ऑटोला ट्रकने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात 7 मुलांचा मृत्यू झाला आहे. एक बालक जखमी झाला आहे.

School children DIED DUE TO road accident in Kanker
विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या रिक्षाचा भीषण अपघात.. ट्रकच्या धडकेत ७ विद्यार्थी जागीच ठार..
author img

By

Published : Feb 9, 2023, 6:00 PM IST

कांकेर (छत्तीसगड): छत्तीसगडमध्ये रस्ते अपघातात सात शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. कांकेर येथील कोरेरजवळ भीषण रस्ता अपघात झाला. येथे शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या ऑटोला ट्रकने धडक दिली. या अपघातात 7 मुलांचा मृत्यू झाला आहे. ऑटोमध्ये 8 मुलं असल्याचं सांगण्यात येत आहे. कोरेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही बाब आहे. या अपघातात ऑटोमध्ये प्रवास करणाऱ्या 2 मुलांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच वेळी, पहिल्या 3 मुलांचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर आणखी 2 मुलांचाही मृत्यू झाला.

कसा घडला अपघात : कोरेर पोलीस ठाण्यांतर्गत शाळेला झाल्यानंतर सुटी संपवून 8 मुलं ऑटोने आपल्या घरी जाण्यास निघाली होती. यादरम्यान आयुष केंद्र कोरेरजवळ भरधाव वेगात आलेल्या ट्रकने ऑटोला जोरदार धडक दिली. ही घटना एवढी भीषण होती की, ऑटोचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले होते. या अपघातात दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या मुलांसह ऑटोचालकाला जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. अपघात इतका भीषण होता की, या अपघातग्रस्त रिक्षाचे अनेक तुकडे अपघातावेळी हवेत उंच उडाले होते.

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याकडून शोक व्यक्त: कांकेरमधील या अपघातावर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शोक व्यक्त केला आहे. सीएम भूपेश म्हणाले की, 'कांकेर जिल्ह्यातील कोरेर चिल्हाटी चौकात ऑटो आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत झालेल्या अपघातात शाळकरी मुलांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. लहान मुलेही गंभीर जखमी आहेत. सर्वतोपरी मदत केली जात आहे. आरोग्य विभागाकडून सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. देव कुटुंबीयांना धीर देवो. प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.'

  • कांकेर जिला के कोरर चिलहटी चौक पर ऑटो और ट्रक की टक्कर से दुर्घटना में 5 स्कूली बच्चों की आकस्मिक मौत का समाचार बेहद दुखद है।

    4 बच्चे गंभीर रूप से घायल हैं, स्वास्थ्य विभाग द्वारा हर मुमकिन मदद दी जा रही है।

    ईश्वर परिवारजनों को हिम्मत दे। प्रशासन को हर संभव मदद के निर्देश हैं।

    — Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) February 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जखमींना रुग्णालयात केले दाखल: मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शाळा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या ठिकाणी सोडण्यासाठी ऑटो जात असताना वेगवान ट्रकने ऑटोला धडक दिली, यात पाच विद्यार्थी जागीच ठार झाले. स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. बस्तरचे पोलीस महानिरीक्षक पी. सुंदरराज यांनी सांगितले की, जखमी विद्यार्थ्यांना कोरार येथील जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्तांवर योग्य ते सर्व उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

हेही वाचा: Speeding Bus Hit Labors: वेगात आलेल्या बसने ७ कामगारांना चिरडले, चौघे जागीच ठार..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.