गांधीनगर(गुजरात) : गुजरात सरकारने एक महत्त्वाचा निर्णय (Gujarat Government Decision) घेतला आहे. येत्या जुलैमध्ये राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन (Gujarat Special Assembly Session) होणार आहे. या अधिवेशनाला विशेष महत्त्व आहे. कारण त्यात विधानसभेचे अध्यक्ष, मुख्यमंत्री, त्यांचे मंत्रिमंडळ सदस्य, आमदार आणि विधानसभेत काम करणारे इतर अधिकारी यांच्याऐवजी गुजरातमध्ये शिकणारे विद्यार्थी दिसणार (182 Students Become Mla in Gujarat) आहेत. तसेच विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री, आमदार हे प्रेषक म्हणून विधिमंडळात उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे 'नायक' चित्रपटाची पुनरावृत्ती गुजरातमध्ये होताना दिसत आहे.
एक दिवसाचे अधिवेशन चालवणार विद्यार्थी - गुजरात विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यांवर आहेत. 2 जुलै रोजी सभागृहात एक दिवसाचे विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, अध्यक्ष निमाबहेन आचार्य आणि सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार केवळ प्रेक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाचे कामकाज गुजरातमध्ये शिकणारे 182 विद्यार्थी एका दिवसासाठी पाहणार आहेत.
हेही वाचा - Pune ATS : टेरर फंडींग प्रकरणी पुणे दहशतवादी विरोधी पथकाकडून एकाला अटक
इयत्ता दहावी व बारावीचे विद्यार्थी पाहणार कामकाज - गुजरात विधानसभेत 2 जुलै रोजी एक दिवसीय विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. अहमदाबाद येथील एका स्वयंसेवी संस्थेने हा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. ज्यामध्ये इयत्ता 10 ते 12 व विविध जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी विधानसभेत मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, सभापती आणि आमदार म्हणून हजेरी लावतील.
अधिवेशन पाहण्यासाठी 400 प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रित - विधानसभा अध्यक्ष या नात्याने यासंदर्भातील कार्यक्रमाला मंजुरी देण्यात आल्याचे विधानसभा अध्यक्ष निमाबाहेन आचार्य यांनी सांगितले. विधानसभेचे विशेष युवा राजकीय अधिवेशन 2 जुलै रोजी होणार असून, त्यात विद्यार्थी विधानसभेच्या कामकाजाप्रमाणे कामकाज पार पाडतील. गुजरात विधानसभेत हे पहिल्यांदाच होत आहे. त्याआधी राजस्थान विधानसभेतही अशीच योजना आखण्यात आली होती. हे विशेष अधिवेशन पाहण्यासाठी 400 प्रतिष्ठित व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे.