शहजहांपूर - उत्तर प्रदेशमधील शहजहांपूर जिल्ह्यात एक महिन्यापूर्वी महाविद्यालयीन तरुणी शेतात जळालेल्या अवस्थेत आढळली होती. तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आरोपींनी तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र अत्याचार करण्यात अपयश आल्याने त्यांनी या तरुणीला जाळले होते, जळालेल्या अवस्थेत या तरुणीला रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणीसह चार जणांना अटक केली आहे.
चार आरोपींना अटक
दरम्यान पीडितेने मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबानुसार ती घटनेच्या दिवशी कॉलेजमध्ये गेली होती. कॉलेजमध्ये गेल्यानंतर तीची मैत्रिण असलेल्या आरोपी तरुणीने तिला काही मित्रांशी ओळख करून देते, म्हणून कॉलेजपासून जवळच असलेल्या शेताजवळ नेले. तिथे आधीच आरोपी तरुणीच्या बहिणीचा दीर मनिष, तिचा आत्येभाऊ राजू आणि मित्र सुभाष हजर होते. त्यांनी पीडितेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, मात्र पीडितेने केलेल्या विरोधामुळे ते तिच्यावर अत्याचार करू शकले नाहीत. त्यानंतर त्यांनी या मुलीला रॉकेल टाकून जिवंत पेटून दिले, जळालेल्या अवस्थेत या पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या चारही आरोपींना अटक केली असून, तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.