ETV Bharat / bharat

Kalia Monkey: गोष्ट कालिया माकडाची; हा माकड प्राणीसंग्रहालयात भोगतो आहे जन्मठेपेची शिक्षा! - कालिया माकड

आज आम्ही तुम्हाला कानपूर प्राणीसंग्रहालयात कैद असलेल्या एका माकडाबद्दल (Kanpur Kalia monkey) सांगणार आहोत जो त्याच्या गुन्ह्यांसाठी जन्मठेपेची शिक्षा भोगतो आहे. (kalia monkey life imprisonment). त्याचे नाव कालिया आहे. त्याने मिर्झापूरमध्ये आत्तापर्यंत 200 हून अधिक लोकांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आहे.

Kalia Monkey
Kalia Monkey
author img

By

Published : Nov 25, 2022, 4:57 PM IST

कानपूर : गुन्हेगारांना कोर्टात जन्मठेपेची शिक्षा होते हे तुम्ही ऐकले असेल, पण माकडाला जन्मठेपेची शिक्षा झाल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? कानपूरच्या प्राणीसंग्रहालयात एक असे काळे माकड आहे जो जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. (Kanpur Kalia monkey). गतवर्षी 2017 मध्ये जौनपूर येथून अटक करण्यात आलेल्या या माकडाचा गुन्हा हा आहे की त्याने महिला आणि मुलांना जखमी केले आहे. त्याने मिर्झापूरमध्ये सुमारे 200 लोकांना गंभीर जखमी केले आहे. त्यानंतर ते पकडले गेले आणि त्याला कानपूर प्राणीसंग्रहालयात आणण्यात आले. कानपूर प्राणिसंग्रहालयात तैनात असलेले डॉ. नसीर सांगतात की, जेव्हापासून त्याला इथे आणले आहे तेव्हापासून आजतागायत त्याच्या कृतीत सुधारणा झालेली नाही. ते अजूनही आक्रमकच आहे. यामुळे त्याला आता आयुष्यभर पिंजऱ्यातच बंदिस्त राहावे लागणार आहे. (kalia monkey life imprisonment).

कालिया माकड

मांत्रिकाने दिले कालिया नाव : या माकडाची कहाणी एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. कालिया माकड दिसायला सामान्य माकडा सारखाच दिसतो. पण तो एका तांत्रिकासोबत राहायचा आणि तांत्रिकाच्या काळ्या जादू पाहत राहायचा म्हणून त्याचे कालिया हे नाव पडले. तांत्रिकानेच त्याला कालिया असे नाव दिले होते. तांत्रिकाचा त्याच्यावर इतका प्रभाव होता की आजही कोणी त्याच्या जवळ गेलं की त्याला बघून तो काहीतरी मंत्र म्हणत असल्यासारखा बडबडतो. तांत्रिकाच्या मृत्यूनंतर तो अनाथ झाला. यानंतर कालियाने अन्य माकडांच्या कळपात सामील होण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला, परंतु माकडांमधील गटबाजी आणि वर्चस्वाच्या लढाईमुळे तो त्यांच्यात सामील होऊ शकला नाही. त्यानंतर त्याने माकडांव्यतिरिक्त मिर्झापूरमधील अनेक लोकांवर हल्ले करने चालू केले. मिर्झापूरच्या लोकांच्या तक्रारीवरून त्याला वनविभागाच्या पथकाने पकडले. मात्र अनेक दिवस कैदेत ठेवल्यानंतरही त्याच्यात सुधारणा झाली नाही. त्यानंतर त्याला कानपूरला आणून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि २०१४ मध्ये त्याला कारावासाची शिक्षा झाली. चिडिया घरच्या हॉस्पिटलमध्ये त्याचा पिंजरा आहे.

दारू आणि मांसाचे व्यसन : कानपूर झूलॉजिकल पार्कचे डॉ मो. नासिर सांगतात की, कालियाला तांत्रिकाने दारू आणि मांसाचे व्यसन लावले होते. त्यामुळे तो आणखीनच बिघडला. त्याने जौनपूरच्या दारूच्या ठेक्यावरून दारू विकत घेणाऱ्या लोकांवर अनेकदा हल्ला केला आहो. तो त्याची दारू हिसकावून प्यायचा. इतकेच नाही तर तांत्रिकाच्या प्रशिक्षणाचा प्रभाव इतका आहे की आजही कालिया अश्लील हावभाव करायला विसरलेला नाही. डॉक्टरांनी सांगितले की, कालियाला जंगलात सोडण्याची तयारी करण्यात आली होती, परंतु 5 वर्षांची शिक्षा भोगूनही कालियाच्या कृतीत कोणतीही सुधारणा न झाल्याने त्याला जन्मठेपेतचं राहावे लागेल. डॉक्टर म्हणतात की कालिया मानवजातीसाठी धोकादायक आहे, त्यामुळे त्याला आता सोडले जाऊ शकत नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.