ETV Bharat / bharat

Stock Market Update : बाजार उघडताच सेन्सेक्स 600 अंकांनी तर निफ्टीही 189 अंकांनी घसरला - Nifty fell by 189 points

शेअर बाजार (Stock market) उघडताच शुक्रवारी सेन्सेक्स 600 अंकाने (Sensex fell by 600 points) तर निफ्टी 189 अंकाने ( Nifty fell by 189 points) घसरल्यचे पहायला मिळाले. दोन दिवसांच्या सकारात्मक वाढणाऱ्या बाजाराला त्यामुळे सुरवातीलाच ब्रेक लागल्याचे पहायला मिळाले.

Stock Market
शेअर बाजार
author img

By

Published : Apr 22, 2022, 10:09 AM IST

मुंबई: गेले दोन दिवस शेअर बाजार (Stock market) सकारात्मक वाढताना दिसला होता, मात्र आज सुरवातील या वाढिला ब्रेक लागल्याचे पहायला मिळाले. शुक्रवारी बाजारात आठवड्याचा शेवटच्या व्यवहार होत आहे. यात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 379.73 अंकांच्या घसरणीसह 57,531 वर उघडला. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 629 अंकांच्या मोठ्या घसरणीसह (Sensex fell by 600 points) 57282 च्या पातळीवर होता. तर, निफ्टी 189 अंकांच्या घसरणीसह ( Nifty fell by 189 points) 17203 वर व्यवहार करत होता.

शेअर बाजारात गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी बीएससी सेन्सेक्स 874 अंकांपेक्षा जास्त वाढून बंद झाला होता . रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लि, या कंपन्यांचे शेअर्स मजबूत होते. जागतिक बाजारातील संमिश्र ट्रेंडमध्ये ही भारतीय बाजारात तेजी पहायला मिळाली. सेन्सेक्स 874.18 अंकांनी म्हणजेच 1.53 टक्क्यांनी वाढून 57,911.68 वर बंद झाला होता. दरम्यान, तो एका वेळी 954.03 अंकांवर चढला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही २५६.०५ अंकांनी म्हणजेच १.४९ टक्क्यांनी वाढून १७,३९२.६० वर बंद झाला होता.

दोन दिवसांत शेअर बाजारांमध्ये गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 5.74 लाख कोटी रुपयांची वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. जागतिक स्तरावर सकारात्मक ट्रेंडमध्ये गुंतवणूकदारांनी खालच्या पातळीवर खरेदी केली, ज्यामुळे बाजार मजबूत राहिला. शेअर बाजारात दोन दिवसांच्या तेजीमुळे बीएससी वर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 5,74,427.92 कोटी रुपयांनी वाढून 2,71,77,156.37 कोटी रुपयांवर पोहोचले.

हेही वाचा : IMF : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने देशाची आर्थिक विकासाच्या दरात वर्तवली 8 टकक्यांनी घट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.