ETV Bharat / bharat

Vaishno Devi Bhawan Stampede : वैष्णोदेवी यात्रेत चेंगराचेंगरीमुळे 12 भाविकांचा मृत्यू - Latest Jammu News in Hindi

माता वैष्णोदेवी भवनात नवीन वर्षात चेंगराचेंगरी (Stampede occurs at Mata Vaishno Devi Bhawan)  होऊन १२ भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. चेंगराचेंगरीत मरण पावलेले भाविक दिल्ली (Delhi), हरियाणा (Haryana), पंजाब (Punjab) येथून आले होते.

Vaishno Devi Bhawan
Vaishno Devi Bhawan
author img

By

Published : Jan 1, 2022, 8:02 AM IST

Updated : Jan 1, 2022, 2:37 PM IST

जम्मू कश्मीर - माता वैष्णोदेवी भवनात नवीन वर्षात चेंगराचेंगरी (Stampede occurs at Mata Vaishno Devi Bhawan) होऊन १२ भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. या भागात मदत आणि बचाव कार्य सातत्याने सुरू आहे. स्थानिक प्रशासनाने आतापर्यंत 14 ते 15 लोकांना वाचवले आहे.

वैष्णोदेवी यात्रेत चेंगराचेंगरीमुळे 12 भाविकांचा मृत्यू

चेंगराचेंगरीत मरण पावलेले भाविक दिल्ली (Delhi), हरियाणा (Haryana), पंजाब (Punjab) येथून आले होते. या घटनेत ठार झालेला एक भाविक हा जम्मू-काश्मीरचा (Jammu Kashmir) रहिवासी आहे. सामुदायिक आरोग्य केंद्राचे ब्लॉक मेडिकल ऑफिसर डॉ गोपाल दत्त यांच्या म्हणण्यानुसार, मृत्यूच्या आकड्यांबाबत नेमकी माहिती अद्याप उपलब्ध नाही. मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. जखमींना नारायणा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात किती जण जखमी झाले याचा नेमका आकडा समोर आला नाही. चेंगराचेंगरीमुळे वैष्णोदेवी यात्रा थांबवण्यात आली आहे. नववर्षानिमित्त माता वैष्णोदेवी मंदिरात दर्शन घेण्यासाठी अनेक राज्यातून भाविक कटरा येथे पोहोचले आहेत. सणांच्या निमित्ताने माता वैष्णोदेवी मंदिरात (Mata Vaishno Devi Bhawan) दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या इतर दिवसांच्या तुलनेत वाढते, त्यामुळे चेंगराचेंगरी कशी झाली, हेही कळू शकलेले नाही.

  • An ex-gratia of Rs 2 lakh each from PMNRF would be given to the next of kin of those who lost their lives due to the stampede at Mata Vaishno Devi Bhawan in Katra, J&K. The injured would be given Rs. 50,000: PM Modi

    (file pic) pic.twitter.com/LMePwZ95N6

    — ANI (@ANI) January 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पंतप्रधानांकडून मृत्यूमुखींना 2 लाख रुपयांची मदत

माता वैष्णोदेवी भवनात नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच चेंगराचेंगरीत १२ भाविकांचा मृत्यू झाला आहे. याघटनेत आपला जीव गमावलेल्यांना पीएम केयर फंडातून प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमी झालेल्यांना 50 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे.

  • An ex-gratia of Rs 10 lakh for the next of kin of those who died in the stampede at Mata Vaishno Devi Bhawan in Katra; Rs 2 lakh for the injured: J&K LG Manoj Sinha pic.twitter.com/XiM0hfOlFE

मृत्यूमुखींना 10 तर जखमींना 2 लाख रुपये; मनोज सिन्हांची घोषणा

वैष्णोदेवी येथील चेंगराचेंगरीत मृत्यूमुखी पडलेल्या भाविकांना जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) सरकारकडून 10 लाख रुपये तर जखमी झालेल्यांना 2 लाख रुपये देणार असल्याचे जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी ट्विटरद्वारे सांगितले.

हेही वाचा - Srinagar Encounter : श्रीनगरमध्ये 3 दशतवाद्यांचा खात्मा; 4 जवान जखमी

Last Updated : Jan 1, 2022, 2:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.