टुमकुरू (कर्नाटक) - आर्थिक परिस्थिती हीदेखील गुणवत्तेच्या आड येत नसल्याचे कर्नाटकमधील विद्यार्थिनीने दाखवून दिली आहे. ग्रीष्मा ही कोराटागेगेरे या गावातील दहावीची विद्यार्थिनी आहे. फी न भरल्यामुळे तिला दहावीच्या वार्षिक परीक्षेला बसू देण्यात आले नव्हते. त्यामुळे तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामधून प्राण वाचल्यानंतर तिने दहावीची पुरवणी परीक्षा दिली. या परीक्षेत कर्नाटकमध्ये सर्वप्रथम आली आहे.
कर्नाटकमध्ये दहावीची 2020-21 ही पुरवणी परीक्षा 27 आणि 29 सप्टेंबरला पार पडली. नुकतेच परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. वडील नरसिंहमुर्ती आणि आई पद्मावती या दोघांनी तिला इंग्रजी माध्यम शाळेत घातले होते. तिला दहावीच्या पुरवणी परीक्षेत 625 पैकी 599 मार्क्स मिळाले आहेत. नववीच्या परीक्षेत तिने 95 टक्के मार्क्स मिळाले होते. मात्र, दहावीत तिने एसएसएलसी (दहावीची अंतिम परीक्षा) परीक्षेची फी भरली नाही. त्यामुळे तिला परीक्षेला बसू देण्यात आले नव्हते.
हेही वाचा-सुरक्षा दलाला मोठे यश! त्रालमधील चकमकीत जैश कमांडरला कंठस्नान
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शिक्षण मंत्र्यांकडे मदतीसाठी प्रयत्न करूनही विद्यार्थिनीच्या कुटुंबाला यश आले नाही. निराश झालेल्या ग्रीष्माने 17 जुलैला घरात आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. वेळीच तिच्यावर उपचार केल्याने तिला मृत्यूच्या दाढेतून वाचविण्यात यश आले.
हेही वाचा-VIDEO काँग्रेसवर लाजिरवाणा प्रसंग; पत्रकार परिषदेपूर्वी दोन नेत्यांमध्ये टक्केवारीची कुजबूज
शिक्षणमंत्री सुरेश कुमार यांनी घरी जाऊन तिची भेट घेतली होते. तिचे व कुटुंबाचे सांत्वन केले होते. ग्रीष्माला एसएसएलसीची मुख्य परीक्षा देता आली नव्हती. मात्र, पुरवणी परीक्षा देण्याची परवानगी देण्यात आली. या परीक्षेतील यशाने तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
हेही वाचा-ड्रॅगनचे फुत्कारे! उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडुंच्या अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर चीनचा आक्षेप