ETV Bharat / bharat

Emergency in Sri Lanka : श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी जाहीर केली आणीबाणी

श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी शनिवारी बेट राष्ट्रात आणीबाणी जाहीर केली (Sri Lankan president declares state of emergency), राष्ट्रपतींनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत संतप्त निदर्शकांनी त्यांच्या घराजवळ निदर्शने केले होते. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (President Gotabaya Rajapaksa) यांनी सार्वजनिक सुरक्षा अध्यादेशाचे कलम, जे सार्वजनिक सुरक्षा, सुव्यवस्थेचे रक्षण, दंगल किंवा नागरी गोंधळ दडपण्यासाठी किंवा जीवनावश्यक वस्तूंच्या देखभालीसाठी नियम बनविण्याचा अधिकार राष्ट्रपतींना राहणार आहे.

श्रीलंकेत आणीबाणी
author img

By

Published : Apr 2, 2022, 12:46 PM IST

कोलंबो: आणीबाणीच्या नियमांनुसार, अध्यक्षांना पुर्ण अधिकार राहतील, ते कोणत्याही मालमत्तेचा ताबा घेऊ शकतात आणि कोणत्याही परिसराची झडती घेऊ शकतात. ते कोणताही कायदा बदलू किंवा रद्दही करू शकतात. राष्ट्रपतींच्या घराजवळ झालेल्या निदर्शनांनंतर अनेकांना अटक करण्यात आली. त्यानंतर एका दिवसात हा आदेश निघाला. रविवारी सार्वजनिक निषेधाचे आवाहनही करण्यात आलेले आहे. राजपक्षे यांच्या कार्यालयाने गुरुवारी रात्री निदर्शना दरम्यान हिंसाचारासाठी हजारो निदर्शकांमधील संघटित आंदोलकांना दोषी ठरवले, जिथे पोलिसांनी अश्रुधुर आणि पाण्याचे फवारेसोडले होते. तसेच 54 जणांना अटक केली होती यावेळी अनेक लोक जखमी झाले आहेत.

आंदोलनाचे प्रतिनिधीत्व करणारे वकील नुवान बोपेजे यांनी सांगितले की, त्यांच्यापैकी अनेकांना विविध वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार होते. राजधानी कोलंबोच्या उपनगरात लागू करण्यात आलेला पोलिस कर्फ्यू शुक्रवारी सकाळी उठवण्यात आला. दीर्घकाळ वीज खंडित होणे आणि जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा यासाठी आंदोलक राजपक्षे यांना दोष देत आहेत. श्रीलंकेवर कर्जाचा डोंगर झाला आहे. तसेच परकीय गंगाजळी कमी होत चालली आहे, आयातीसाठी पुरेसा पैसा नसल्यामुळे टंचाई निर्माण झाली आहे. लोक इंधनासाठी लांबच्या रांगेत थांबतात आणि वीजनिर्मिती करणारे संयंत्र चालवण्यासाठी पुरेसे इंधन नसल्यामुळे आणि कोरड्या हवामानामुळे जलविद्युत क्षमता कमी झाल्यामुळे दररोज अनेक तास वीज खंडित होत आहे.

गुरुवारी, कोलंबोच्या बाहेरील राजपक्षे यांच्या खाजगी निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर निदर्शने करणाऱ्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलीस वापरत असलेल्या लष्कराच्या दोन बसेसवर दगडफेक झाली होती. त्यांनी एका बसला आग ही लावली. वरिष्ठ पोलिस प्रवक्ते अजित रोहणा यांनी माध्यमाला सांगितले की, या आंदोलनाच्या वेळी 24 पोलिस कर्मचारी आणि इतर अनेक नागरिक जखमी झाले आणि पोलिस आणि सैन्याच्या अनेक वाहनांना आंदोलकांनी जाळले. यात सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पोलिसांनी दंगल नियंत्रणासाठी नियमांचे पालन केले आणि विरोध सुरू झाल्यानंतर चार तासांहून अधिक काळा नंतर वातावरण हिंसक झाल्यानंतरच कारवाई केली.

कोविड-19 साथीच्या रोगाने श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून, गेल्या दोन वर्षांत सरकारने 14 अब्ज डॉलरचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पैसे न कमावणाऱ्या प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतल्यानंतर श्रीलंकेवरही प्रचंड विदेशी कर्ज झाले आहे. त्याची परदेशी कर्ज परतफेडीची जबाबदारी या वर्षासाठी सुमारे $7 अब्ज आहे. सेंट्रल बँकेच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारीमध्ये महागाईचा दर एका महिन्यापूर्वीच्या 16.8% वरून वाढून 17.5% झाला. सरकारने स्थानिक चलनाला मुक्तपणे परवानगी दिल्याने त्याचे प्रमाण वाढत राहणे अपेक्षित आहे.

हेही वाचा : 'रशिया- जर्मनीचा मृत्यू.. अमेरिका, आफ्रिका आणि जपान एकमेकांसाठी जीव देण्यासही तयार..' पहा संपूर्ण कहाणी..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.