ETV Bharat / bharat

Sri Lankan fuel crisis: इंधन संकटात सापडलेल्या श्रीलंकेतील विमान उद्योगाला मिळाली संजीवनी

श्रीलंका (Sri Lankan fuel crisis) आर्थिक संकटात सापडला असताना, विमान वाहतुकीसाठी कोणतेही इंधन उपलब्ध नसताना, तिरुवनंतपुरम आणि कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ (International Airports Thiruvananthapuram and Kochi ) श्रीलंकेतील आजारी विमान उद्योगाला मदत करण्यासाठी पुढे आले आहे. तिरुअनंतपुरम विमानतळ हे कोलंबोचे सर्वात जवळचे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. तर कोची विमानतळाने कोलंबोहून इतर देशांच्या विमान सेवांसाठी तांत्रिक लँडिंगची सोय केली आहे.

author img

By

Published : Jul 13, 2022, 3:43 PM IST

Sri Lankan fuel crisis
श्रीलंका

तिरुअनंतपुरम: श्रीलंका (Sri Lankan fuel crisis) आर्थिक संकटात सापडला असताना, विमान वाहतुकीसाठी कोणतेही इंधन उपलब्ध नसताना, तिरुवनंतपुरम आणि कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ (International Airports Thiruvananthapuram and Kochi) श्रीलंकेतील आजारी विमान उद्योगाला मदत करण्यासाठी पुढे आले आहे. तिरुअनंतपुरम विमानतळ हे कोलंबोचे सर्वात जवळचे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. आणि कोची विमानतळाने कोलंबोहून इतर देशांच्या विमान सेवांसाठी तांत्रिक लँडिंगची सोय केली आहे. तसेच, आता हे दोन्ही विमानतळ श्रीलंकाच्या विमानांना इंधन भरण्यासाठी मदत करत आहे. आतापर्यंत, एकुण 90 विमानांनी उड्डाण घेतलं आहे. त्यात, 61 श्रीलंकन ​​एअरलाइन्सची आणि 29 इतर आंतरराष्ट्रीय एअरलाइन्सची आहेत. कोलंबो ते फ्रँकफर्ट, कोलंबो ते पॅरिस आणि कोलंबो ते मेलबर्न अशी श्रीलंकन ​​एअरलाइन्सची उड्डाणे तिरुअनंतपुरमहून इंधन भरत आहेत. याशिवाय फ्लाय दुबई, एअर अरेबिया, गल्फ एअर आणि ओमान एअरची उड्डाणेही तिरुअनंतपुरमहून इंधन भरत आहेत.

तिरुअनंतपुरम विमानतळाला १ कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे. इंधन भरण्यासाठी प्रति तांत्रिक लँडिंग 1 लाख रुपये शुल्क आहे. अदानी विमानतळ प्राधिकरणाने सांगितले की, मोठ्या संकटात सापडलेल्या आपल्या शेजारी राष्ट्राला मदतीचा हात म्हणून ही सुविधा देण्यात आली आहे. ते म्हणाले की, यात व्यावसायिक हित नसून शेजारील राष्ट्राप्रती एक सामाजिक जबाबदारी आहे. केंद्र सरकारने इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम यांना श्रीलंकेतून उड्डाणांसाठी विमान वाहतूक टर्बाइन इंधन पुरवण्याचे निर्देश दिले आहेत.

विमानतळ प्राधिकरणाने सांगितले की, मध्यरात्री 12 ते पहाटे 5 या दरम्यान रहदारीच्या वेळेत उड्डाणे सर्वाधिक इंधन भरण्यासाठी येतात. लँडिंग आणि इंधन भरण्यासाठी श्रीलंकेतून उड्डाणांन करणाऱ्या विमानांना प्राधान्य देण्याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. कोलंबो आणि तिरुअनंतपुरम दरम्यानची हवाई वेळ फक्त 20 मिनिटे आहे. तेव्हा,तिरुअनंतपुरम येथे इंधन भरण्यासाठी श्रीलंकेतील विमानांसाठी याचा मुख्य फायदा होतो. तिरुअनंतपुरम विमानतळावर या विमानांना त्यांच्या क्रू बदलण्यासाठी देखील सुविधा पुरविल्या जातात.

कोचीमध्ये, गेल्या आठवड्यापासून ते 11 जुलैपर्यंत 30 फ्लाइट्सने इंधन भरण्यासाठी तांत्रिक लँडिंग केले होते. गेल्या तीन दिवसांत कोलंबोहून 9 उड्डाणे कोची येथे उतरली आणि 4.75 लाख लिटर इंधन भरले. अधिक उड्डाणे आकर्षित करण्यासाठी, कोची इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (CIAL) ने तांत्रिक लँडिंग शुल्क 25 टक्क्यांनी कमी केले आहे. "जेव्हा आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी इंधन भरण्याच्या विनंतीसह आमच्याशी संपर्क साधला. आम्ही आमच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम न करता इंधन भरण्यासाठी अधिक उड्डाणे उतरवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली .अशी माहीती विमानतळ प्राधिकरणाने दिली.

हेही वाचा: WORLD GREATEST PLACES OF 2022: जगातील सर्वोत्कृष्ट पर्यटन स्थळांमध्ये केरळ, अहमदाबादचा समावेश, वाचा 'टाइम' यादीत कुणाचा आहे समावेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.