ETV Bharat / bharat

Ganesh Chaturthi Puja 2022 यंदा गणपतीचे केव्हा होणार आगमन, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि विसर्जनाची वेळ

हिंदूंचा मुख्य सण गणेशोत्सव Ganeshotsav 31 ऑगस्ट 2022 पासून सुरू होत आहे.भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणपती बाप्पाची स्थापना केली जाते. असे म्हणतात की जिथे बाप्पाचा वास असतो तिथे सदैव सुख समृद्धी असते. तर यावर्षी गणपती बाप्पाचे आगमन अत्यंत शुभ योगाने होत आहे. अशा परिस्थितीत या वर्षी गणेश प्रतिष्ठापना Ganesh Sthapana आणि गणेश विसर्जन कधी Ganpati Visarjan Time आहे हे जाणून घेऊया

Ganesh Chaturthi Puja
गणेश चतुर्थीची पूजा
author img

By

Published : Aug 25, 2022, 4:52 PM IST

यंदाचा गणेशोत्सव Ganeshotsav 31 ऑगस्ट 2022 पासून सुरू होत आहे. भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणपती बाप्पाची स्थापना केली जाते. गणेश चतुर्थीचा सण गणेश जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. या दरम्यान लोक मोठ्या थाटामाटात ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला घरात आणतात. गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये बाप्पाचे नाव सर्वत्र ऐकू येते. गणपतीला बुद्धीची आणि शुभाची देवता मानतात. त्याला विघ्नहर्ता असेही म्हणतात. असे म्हणतात की जिथे बाप्पाचा वास असतो तिथे सदैव सुख-समृद्धी असते. तर यावर्षी गणपती बाप्पाचे आगमन अत्यंत शुभ योगाने होत आहे. अशा परिस्थितीत या वर्षी गणेश प्रतिष्ठापना Ganesh Sthapana आणि गणेश विसर्जन कधी Ganpati Visarjan Time आहे हे जाणून घेऊया

गणेश उत्सव 2022 तारीख पंचांगानुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी ३० ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ३:३४ वाजता सुरू होत आहे. ही तारीख दुसऱ्या दिवशी 31 ऑगस्ट रोजी दुपारी 3:23 वाजता संपेल. उदय तिथीनुसार 31 ऑगस्टपासून गणेशोत्सवाची सुरुवात मानली जाणार आहे. या दिवशी दोन शुभ योग तयार होत आहेत. बुधवार हा गणपतीला समर्पित असून यंदाचा गणेशोत्सवही बुधवारपासून सुरू होत आहे. याशिवाय गणेश चतुर्थीलाही रवियोगाचा योग जुळून येत आहे. अशा परिस्थितीत गणेश चतुर्थीचे महत्त्व अधिकच वाढते. रवि योग 31 ऑगस्ट रोजी सकाळी 06:06 ते 01 सप्टेंबर रोजी सकाळी 12:12 पर्यंत आहे. रवियोगात गणपतीची पूजा केल्याने सर्व संकटांचा नाश होतो, असे मानले जाते.

गणपती विसर्जन कधी होणार गणेश उत्सव हा 10 दिवसांचा असतो. 10 दिवस भक्तांसोबत राहिल्यानंतर श्रीगणेश आपल्या निवासस्थानी परततात. 31 ऑगस्ट रोजी गणपती स्थापनेनंतर 10 दिवसांनी म्हणजेच 9 सप्टेंबर रोजी विसर्जन होणार आहे. रिद्धी आणि सिद्धी आणि शुभ लाभ गणेशाभोवती बसतात. असे मानले जाते की जो व्यक्ती या दिवसांमध्ये श्रीगणेशाची मनापासून पूजा करतो, त्याचे जीवन तणावमुक्त होते.

हेही वाचा Ganeshotsav 2022 पुण्यातील मानाचे पाच गणपती, घ्या जाणून प्रत्येक गणपतीचा इतिहास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.