ETV Bharat / bharat

कोरोनाची आणखी नवी रुपं येणार समोर; एनटीडीसीच्या संचालकांनी व्यक्त केली भीती

देशात सध्या दुसरी कोरोना लाट आली आहे. महाराष्ट्र, पंजाब यांसह इतर राज्यांमध्येही कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे. यासंदर्भात ईटीव्ही भारतचे मध्य प्रदेश ब्युरो चीफ विनोद तिवारी यांनी नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल चे (एनटीडीसी) प्रमुख डॉ. सुदीप सिंह यांच्याशी खास चर्चा केली. यावेळी सुदीप यांनी भारतातील कोरोना परिस्थितीबाबत माहिती दिली. तसेच, कोरोनाची आणखी रुपं (म्युटेशन्स) समोर येणार असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली...

author img

By

Published : Mar 26, 2021, 10:21 PM IST

special talk with ncdc director dr sudeep singh on etv bharat
कोरोनाची आणखी नवी रुपं येणार समोर; एनटीडीसीच्या संचालकांनी व्यक्त केली भीती

भोपाळ : देशात सध्या दुसरी कोरोना लाट आली आहे. महाराष्ट्र, पंजाब यांसह इतर राज्यांमध्येही कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे. यासंदर्भात ईटीव्ही भारतचे मध्य प्रदेश ब्युरो चीफ विनोद तिवारी यांनी नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल चे (एनटीडीसी) प्रमुख डॉ. सुदीप सिंह यांच्याशी खास चर्चा केली. यावेळी सुदीप यांनी भारतातील कोरोना परिस्थितीबाबत माहिती दिली. तसेच, कोरोनाची आणखी रुपं (म्युटेशन्स) समोर येणार असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली...

प्रश्न : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत तुम्ही काय सांगाल?

उत्तर : लोक जेव्हाही कधी कोरोनाला हलक्यात घेतील, तेव्हा देशातील रुग्णसंख्या वाढेल. लोक या महामारीबाबत गंभीर नाहीत, त्यामुळेच रुग्णसंख्या पुन्हा वाढत आहे. आपल्या देशात अजूनही कित्येक लोक असे आहेत ज्यांना कोरोनाची लागण झाली नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीजही तयार झाल्या नाहीत. तसेच आतापर्यंत सर्वांपर्यंत लसही पोहोचली नाही. अशातच लोकांनी गांभीर्य पाळले नाही, तर पुन्हा याचा प्रसार वाढणार आहे.

प्रश्न : कोरोनाच्या विविध प्रकारांबाबत तुमचं काय म्हणणं आहे?

उत्तर : कोरोनाची नवीन रुपं समोर येत आहेत. महाराष्ट्र, पंजाब आणि मध्य प्रदेशमध्येही वेगवेगळे म्युटेशन्स समोर येत आहेत. खरंतर म्युटेशन कोणतेही असो, योग्य ती खबरदारी घेतली तर कोरोना टाळता येणे शक्य आहे.

प्रश्न : यूके, ब्राझील आणि आफ्रिकन म्युटंटबाबत काय म्हणाल?

उत्तर : देशात सध्या यूके स्ट्रेनचे जास्त रुग्ण नाहीत. तसेच ब्राझीलमधील कोरोना स्ट्रेनचाही देशात एकच रुग्ण आढळून आला आहे. जो तसा चिंतेचा विषय नाही.

प्रश्न : महाराष्ट्रातही एक नवा स्ट्रेन समोर आला आहे, काय म्हणाल?

उत्तर : महाराष्ट्रातही कोरोनाचा नवा स्ट्रेन समोर आला आहे. याला डबल म्युटेन म्हणतात. राज्यातील १५ ते २० टक्के लोकांमध्ये हा स्ट्रेन आढळून आला आहे.

प्रश्न : जानेवारीनंतर रुग्णसंख्या अचानक कशी वाढत आहे?

उत्तर : लोकांनी कोरोनाला तितक्या गांभीर्याने घेतले नाही. तसेच, चाचण्यांप्रतिही प्रशासनामध्ये उदासीनता दिसून आली. त्यामुळेच जानेवारीनंतर देशातील कोरोना रुग्ण संख्या वाढू लागली.

प्रश्न : जनतेमध्ये कोरोनाविषयी भीती का नाही?

उत्तर : अजूनही बहुतांश लोकांना वाटतं की सर्वांना कोरोना होऊ शकतो, मात्र मला नाही. या मानसिकतेमुळे कित्येक लोक योग्य ती खबरदारी बाळगत नाही. पहिल्या अनलॉकनंतर तर लोकांना वाटलं कोरोना गेलाच, त्यामुळे लोक अजूनच निश्चिंत झाले.

प्रश्न : लस टोचल्यानंतरही कित्येक लोकांना कोरोना होत आहे, काय सांगाल?

उत्तर : हा खरंतर संशोधनाचा विषय आहे. लसीची सेन्सिटिव्हिटी एका क्षमतेपर्यंत असते.

प्रश्न : केंद्र सरकारच्या सीरो सर्वेचे निष्कर्ष आणि गाईडलाईन काय आहेत?

उत्तर : सीरो सर्वे याबाबत माहिती देतो, की तुम्हाला संक्रमणातून इम्युनिटी मिळेल, की इम्युनायझेशनमधून इम्युनिटी मिळेल.

प्रश्न : कोरोनाशी लढण्यासाठी काय करायला हवं?

उत्तर : सरकार तर त्यांच्याकडून जे होऊ शकतं ते करतच आहे. लोकांनी मात्र निष्काळजीपणा सोडून कोविडला गांभीर्याने घ्यायला हवं. कोरोना गेलेला नसून, तो आपल्यातच आहे हे लक्षात घेऊन स्वतःची काळजी घ्यायला हवी.

हेही वाचा : कोरोनाची दुसरी लाट १८ ते ४० वयोगटाला घातक - डॉ. अविनाश भोंडवे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.