ETV Bharat / bharat

कल्याण आणि कमळाचा भ्रम, वाद-विवाद, नुकसान; जेव्हा दोघांनाही झाली एकमेकांच्या ताकदीची जाणीव - भाजप

एकेकाळी उत्तर प्रदेशमध्ये कल्याण सिंह म्हणजे भाजप आणि भाजप म्हणजे कल्याण सिंह, असे समजले जात होते. तर, एक काळ असाही होता जेव्हा कल्याण सिंह आणि भाजप हे वेगवेगळे झाले होते. यानंतर, कल्याण सिंह आणि भाजप दोघेही उत्तर प्रदेशच्या राजकारणात किरकोळ झाले. त्यांच्यात अनेकदा वाद झाले.

kalyan singh
kalyan singh
author img

By

Published : Aug 22, 2021, 1:38 AM IST

लखनऊ - एकेकाळी उत्तर प्रदेशमध्ये कल्याण सिंह म्हणजे भाजप आणि भाजप म्हणजे कल्याण सिंह, असे समजले जात होते. पण 1999 मध्ये अशी वेळ आली, जेव्हा कल्याण सिंह आणि एकमेकांना पूरक असलेले भाजप कट्टर प्रतिस्पर्धी बनले.

...अन् भाजप आणि कल्याण सिंह यांना आपली ताकद कळाली

अशा घडामोडी देखील घडल्या, ज्यामुळे कल्याण सिंह यांना पक्ष सोडावा लागला. कल्याण सिंह यांच्या राष्ट्रीय क्रांती पक्षाने 2012 च्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रवेश केला. तेव्हा भाजपचा सूपडा साफ झाला आणि भाजप 1991 नंतर सगळ्यात खाली गेले. त्या निवडणुकीत भाजपला फक्त 47 जागा मिळाल्या. दुसरीकडे, कल्याण सिंह यांचा राष्ट्रीय क्रांती पक्ष केवळ या निवडणुकीत मते खाणारा पक्ष बनला. यानंतर कल्याण सिंह आणि भाजपला एकमेकांच्या ताकदीची जाणीव झाली.

कल्याण आणि कमळाचा भ्रम, वाद-विवाद, नुकसान

भाजप- कल्याण सिंह पुन्हा एकत्र आले आणि...

अशा परिस्थितीत 2013 मध्ये नरेंद्र मोदींनी भाजप नेतृत्वाची चावी घेतली. मोदींनी पंतप्रधानपदाची उमेदवारी जाहीर केल्यानंतर कल्याण सिंह पुन्हा एकदा भाजपचे तत्कालीन उत्तर प्रदेश प्रभारी अमित शहा यांच्या पुढाकाराने पक्षात परतले. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशच्या राजकीय इतिहासात तो चमत्कार करून दाखवला, जो आजपर्यंत कोणी करू शकले नाही. 2014 च्या निवडणुकीत भाजप आणि त्याचा सहयोगी अपना दल पार्टीने यूपीतील 80 लोकसभा जागांपैकी 73 जागा जिंकल्या. त्यापैकी एकट्या भाजपने 71 जागा जिंकल्या. त्यानंतर 2014 मध्ये केंद्रात भाजपचे सरकार स्थापन झाले. यानंतर 2017 च्या निवडणुकीतही भाजपने आपला किल्ला राखला.

कल्याण सिंह यांचा दर्जा इतका वाढला, की...

राजकीय विश्लेषक विजय शंकर पंकज म्हणतात, की राम मंदिराच्या चळवळीमुळे कल्याण सिंह यांचा दर्जा इतका वाढला होता की त्यांना त्यांच्यापुढे सर्व नेत्यांचा दर्जा एक कमी वाटू लागला होता. मायावतींनी भाजपला सत्ता हस्तांतरित न करणे आणि फेरफार करून भाजप सरकार स्थापन करणे या दरम्यान कल्याण सिंह यांचा स्वतःच्या पक्षातील अनेक नेत्यांशी दुरावा निर्माण झाला होता. केंद्रीय नेत्यांशी तणाव इतका वाढला की कल्याण सिंह यांना भाजप सोडून जावे लागले.

कल्याण सिंह यांचा भ्रम आणि अटल बिहारी वाजपेयीबद्दल वक्तव्य

विजय शंकर पंकज म्हणतात, की कल्याण सिंह यांचा असा भ्रम झाला होता की त्यांच्यामुळे पक्ष आहे. दुसरीकडे, इतर काही पक्षाच्या नेत्यांनाही असाच भ्रम होता. यामुळे भाजप आणि कल्याण या दोघांचेही नुकसान झाले. केंद्रीय नेतृत्वाशी तणाव वाढल्यानंतर कल्याण सिंग यांनी एकदा तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दल असेही म्हटले होते की, ते फक्त पक्षाचा मुखवटा आहेत.

पुन्हा वाद आणि पुन्हा भाजप-कल्याण सिंह आमने-सामने

भाजपमधून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर कल्याण सिंह यांनी जनक्रांती पार्टीची स्थापना केली. 2002 च्या यूपी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने प्रवेश केला. त्यांच्या पक्षाला फक्त 4 जागा मिळाल्या. या निवडणुकीत भाजपला 88, सपाला 143, बसपाला 98, काँग्रेसला 25 आणि आरएलडीला 14 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत भाजपचे मोठे नुकसान झाले. यानंतर कल्याण सिंह पुन्हा भाजपमध्ये आले. कल्याण सिंह भाजपमध्ये असताना 2007 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. पण, कल्याण सिंह परतल्यानंतर भाजपमध्ये मतभेद वाढले. वास्तविक, कल्याणसिंह स्वतःला जुने कल्याण समजत होते आणि ते स्वतःच्या अटींवर भाजप चालवण्याचा प्रयत्न करत होते. दुसरीकडे, पक्षाचे अनेक बलवान नेते त्यांना बाहेरचा दर्जा देत होते. निवडणुका कशातरी पार पडल्या, पण पक्षाला या निवडणुकीतही अपेक्षित यश मिळाले नाही. भारतीय जनता पक्ष 51 जागांवर खाली आला. या निवडणुकीत, बसपा आपल्या सामाजिक अभियांत्रिकी सूत्रासह स्वबळावर बहुमताचा आकडा पार करण्यात यशस्वी झाली आणि मायावती राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या. यानंतर कल्याण सिंह आणि भाजपचा मार्ग पुन्हा वेगवेगळा झाला.

कल्याण आणि कमळाचा भ्रम, वाद-विवाद
कल्याण आणि कमळाचा भ्रम, वाद-विवाद

कल्याण सिंह-मुलायम सिंह यांची मैत्री आणि नुकसान

यानंतर 2009 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी कल्याण सिंह यांनी मुलायम सिंह यादव यांच्याशी हातमिळवणी केली. या निवडणुकीत कल्याण सिंह यांनी एटामधून अपक्ष निवडणूक लढवली. पण, ते मुलायम सिंह यांच्यासोबत सपासाठी प्रचार करताना दिसले. पण, कल्याण सिंह आणि मुलायम सिंह यांची मैत्रीने सपाला भारी पडली. सपाला फक्त 24 जागा मिळाल्या. त्यानंतर मुलायम सिंह यादव यांनी कल्याण सिंहांपासून स्वतःला दूर केले. या निवडणुकीत भाजपचेही मोठे नुकसान झाले.

कल्याण सिंह विभक्त झाल्यानंतर भाजपला सर्वात मोठा धक्का

2012 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची सर्वात वाईट परिस्थिती झाली, जेव्हा कल्याण सिंह यांनी भाजपच्या विरोधात जोरदार आघाडी उघडली. यावेळी कल्याण सिंह यांच्या जनक्रांती पक्षाचे 200 हून अधिक उमेदवार मैदानात उतरले. यावेळी कल्याण सिंह यांच्या पक्षाला कोणतेही यश मिळाले नाही. पण, भारतीय जनता पक्षही 50 च्या खाली पोहोचला. भाजपला 47 जागांवर समाधान मानावे लागले. भाजपने 1991 नंतरची सर्वात खालची पातळी गाठली. यावेळी राज्यातील जनतेने समाजवादी पक्षाला आशीर्वाद दिले आणि प्रचंड बहुमताने अखिलेश यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. कल्याण सिंह विभक्त झाल्यानंतर भाजपला हा सर्वात मोठा धक्का होता.

जेव्हा भाजप आणि कल्याण सिंह यांचा भ्रम तुटला

ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक पी.एन. द्विवेदी म्हणतात, की 2012 च्या विधानसभा निवडणुकीत कल्याण सिंह आणि भारतीय जनता पक्ष या दोघांचाही भ्रम सुटला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कल्याणने भाजपमध्ये प्रवेश केला. हा निव्वळ योगायोग असू शकतो. पण तेव्हापासून भाजप सातत्याने आघाडीवर आहे. राजकीय जगात कल्याण सिंह जातीपेक्षा वर जाताना दिसले. पण, एक वस्तुस्थिती अशीही आहे, की लोध बंधू ज्यामधून कल्याण सिंह येतात, उत्तर प्रदेशात लोध बंधुंची खूप मोठी ताकद आहे. लोध समाजाचे लोक त्यांना आपला नेता मानतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.