ETV Bharat / bharat

दिल्लीमध्ये पाच दहशतवादी ताब्यात; स्पेशल सेलची कारवाई..

दिल्ली पुलिस की स्पेशल सेल ने मुठभेड़ के बाद प्रतिबंधित खालिस्तानी और इस्लामिक संगठन से संबंध रखने वाले पांच आरोपियों को गिरफ्तार किया है.

special cell arrested 5 people after exchange of fire in shakarpur
दिल्लीमध्ये पाच दहशतवादी ताब्यात; स्पेशल सेलची कारवाई..
author img

By

Published : Dec 7, 2020, 9:57 AM IST

Updated : Dec 7, 2020, 1:39 PM IST

09:51 December 07

दिल्लीमध्ये पाच दहशतवादी ताब्यात..

दिल्लीमध्ये पाच दहशतवादी ताब्यात; स्पेशल सेलची कारवाई..

नवी दिल्ली : शहराच्या शकरपूर भागामध्ये झालेल्या चकमकीनंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने पाच दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. हे सर्व दहशतवादी खलिस्तानी आणि इस्लामिक संघटनांशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे.

स्पेशल सेलचे पोलीस उपायुक्त प्रमोद खुशवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पाच जणांकडून बऱ्याच प्रमाणात शस्त्रसाठा आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. यांपैकी दोघे पंजाबचे आहेत, तर तीन जण काश्मीरचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थ जप्त..

या दहशतवाद्यांकडून तीन पिस्तुलं आणि दोन किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. यासोबतच एक लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात आल्याची माहिती खुशवाला यांनी दिली.

आयएसआयचा पाठिंबा..

दिल्ली पोलिसांमधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांना आपल्या कारवायांसाठी पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयकडून पाठिंबा मिळत होता. आखाती देशांमध्ये असलेला सुखमीत नावाचा एक व्यक्ती आणि इतर काही गँगस्टर्सशी या दहशतवाद्यांचे संबंध होते. या गँगस्टर्सचे संबंध आयएसआयशी आहेत अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. या दहशतवाद्यांच्या अटकेने हेच सिद्ध होते की कशा प्रकारे आयएसआय खलिस्तानी चळवळीला काश्मीरमधील दहशतवादी कारवायांसाठी वापरुन घेत आहे, असे खुशवाला म्हणाले.

बलविंदर सिंग यांच्या हत्येमध्ये या दहशतवाद्यांचा हात..

पंजाबचे शौर्यचक्र पुरस्कार विजेचे बलविंदर सिंग यांची ऑक्टोबरमध्ये हत्या करण्यात आली होती. या हत्येमध्ये या पाच दहशतवाद्यांपैकी दोघांचा हात होता. गुरजीत सिंग भुरा आणि सुखदीप अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. दिल्ली पोलिसांनी याबाबत माहिती दिली. याप्रकरणी पंजाब पोलिस अधिक तपास करत आहे. कदाचित आज ताब्यात घेतलेल्या शस्त्रांचाच वापर बलविंदर यांच्या हत्येमध्ये केला असावा, असे खुशवाला म्हणाले.

काश्मीरमधील तिघे हिजबुलशी संबंधित..

अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी तिघे काश्मीरी होते. ते हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेसाठी काश्मीर खोऱ्यात आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये काम करत होते. खलिस्तानी संघटना आणि हिजबुल या दोन्हींमधला दुवा म्हणून याठिकाणी आयएसआय काम करत आहे, असे खुशवाला यांनी म्हटले.

पंजाबमधील हत्या करत, काश्मीरमधील अमली पदार्थ पुरवत..

हे दहशतवादी दोन पथकांप्रमाणे काम करत. पंजाबमधील दहशतवाद्यांचे पथक हे हत्या करणारे पथक होते, तर काश्मीरमधील दहशतवादी अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री करत होते. या कामांमधून मिळालेल्या पैशांचा उपयोग ते दहशतवादी कारवायांसाठी करत होते.

शेतकरी आंदोलनाशी संबंध नाही..

शेतकरी आंदोलकांमध्ये मोठ्या प्रमाणात खलिस्तानी असल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून केला जातो आहे. यासंदर्भात या प्रकरणाचा काही संबंध आहे का, असे विचारले असता शेतकरी आंदोलन आणि हे प्रकरण याचा काहीही संबंध नाही असे स्पष्टीकरण खुशवाला यांनी दिले.

हेही वाचा : 'दिल्ली चलो' आंदोलनाचा १२वा दिवस; दररोज वाढतोय शेतकऱ्यांना देशभरातून मिळणारा पाठिंबा..

Last Updated : Dec 7, 2020, 1:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.