नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ( National Herald money laundering case ) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची दोन तास चौकशी ( Sonia Gandhi ED Enquiry ) करून जबाब नोंदवले. कोविडमधून बरे होत असल्याने त्यांच्या विनंतीवरून आज दिवसभराची चौकशी संपविण्यात आल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी ( Sonia Gandhi leaves ED office ) सांगितले.
१२.३० वाजता चौकशी झाली सुरु : गांधी, 75, मध्य दिल्लीतील ए पी जे अब्दुल कलाम रोडच्या बाजूला असलेल्या विद्युत लेन येथे असलेल्या ईडी मुख्यालयात दुपारनंतर थोड्या वेळाने त्यांच्या झेड + श्रेणीच्या सीआरपीएफ सुरक्षा कवचात पोहोचल्या. समन्सची पडताळणी आणि हजेरी पत्रकावर स्वाक्षरी अशा काही औपचारिकता पूर्ण केल्यानंतर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास चौकशी सुरू झाली, असे सूत्रांनी सांगितले.
-
Delhi | Congress interim president Sonia Gandhi leaves from ED office after questioning in the National Herald case. pic.twitter.com/j0iWgoBqsZ
— ANI (@ANI) July 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Delhi | Congress interim president Sonia Gandhi leaves from ED office after questioning in the National Herald case. pic.twitter.com/j0iWgoBqsZ
— ANI (@ANI) July 21, 2022Delhi | Congress interim president Sonia Gandhi leaves from ED office after questioning in the National Herald case. pic.twitter.com/j0iWgoBqsZ
— ANI (@ANI) July 21, 2022
वैद्यकीय कारणामुळे जाण्याची परवानगी : वैद्यकीय कारणास्तव त्यांच्या विनंतीवरून त्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे सूत्रांनी सांगितले. नॅशनल हेराल्ड या वृत्तपत्राची मालकी असलेल्या काँग्रेस प्रमोट केलेल्या यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडमधील कथित आर्थिक अनियमिततेशी संबंधित ही चौकशी आहे.
संसदेत गदारोळ : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना आज ईडीसमोर हजर राहावे लागणार आहे. नॅशनल हेराल्ड संबंधी मनी लाँड्रिंग प्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे. मात्र, त्यांच्या चौकशी आधीच देशात काँग्रेस पक्षाकडून ईडी ( Uproar in Parliament over Sonia Gandhi ED inquiry ) आणि केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली जात आहे. या विरोधाची ठिणगी संसदेतही पडली आहे. राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांमध्ये घोषणाबाजी झाल्याने तेथील कामकाज तहकूब ( Lok Sabha adjourned ) करण्यात आले आहे. लोकसभेत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी विरोधकांवर चांगलेच संतापले. कायद्यापुढे सर्वे सारखे आहेत की नाही? काँग्रेस अध्यक्ष काय सुपर ह्यूमन आहेत का? काँग्रेस स्वत: ला कायद्याच्या वरती समजते काय? असा संतप्त सवाल करत जोशी यांनी विरोधकांना धारेवर धरले.