नवी दिल्ली - काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी ( Sonia Gandhi ) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डॉक्टरांनी त्यांना सध्या घरी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. ( Sonia Gandhi Health ) काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. सोनिया गांधी (वय 75) यांना 2 जून रोजी कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले होते. ( Sonia Gandhi discharged from Gangaram Hospital ) त्यानंतर त्यांना दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
-
Sonia Gandhi discharged from Delhi's Ganga Ram Hospital
— ANI Digital (@ani_digital) June 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/db4aA19QZe#SoniaGandhi #Congress #COVID19 pic.twitter.com/jBiHPW02b2
">Sonia Gandhi discharged from Delhi's Ganga Ram Hospital
— ANI Digital (@ani_digital) June 20, 2022
Read @ANI Story | https://t.co/db4aA19QZe#SoniaGandhi #Congress #COVID19 pic.twitter.com/jBiHPW02b2Sonia Gandhi discharged from Delhi's Ganga Ram Hospital
— ANI Digital (@ani_digital) June 20, 2022
Read @ANI Story | https://t.co/db4aA19QZe#SoniaGandhi #Congress #COVID19 pic.twitter.com/jBiHPW02b2
काँग्रेसचे संपर्क प्रभारी जयराम रमेश यांनी सांगितले की, 12 जून रोजी सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याने उपचारात गुंतागुंत निर्माण झाली होती. (Sonia Gandhi discharged from hospital ) दरम्यान, नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनीया गांधी यांना 23 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने सांगितले आहे. मात्र, डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला असल्यामुळे त्या उपस्थित राहतील की नाही याबद्दल शंका आहे.
सोनिया गांधी यांना यापूर्वी ८ जून रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले होते, परंतु त्यांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्यामुळे त्यांना तपास यंत्रणेसमोर हजर राहण्यासाठी नवीन तारीख देण्यास सांगण्यात आले होते. तपास यंत्रणा आधीच काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची चौकशी करत असून त्यांची आज चौथ्यांदा चौकशी होत आहे.
सोनिया गांधी 75 वर्षांच्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्या विविध आजारांशी झुंज देत आहेत. सोनिया गांधी यांना 12 जुन रोजी त्यांना संध्याकाळी सौम्य ताप आला होता. त्यानंतर त्यांची तपासणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. ( Sonia Gandhi Infected With Corona ) कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर सोनिया गांधी यांनी सध्या वेगळ्या राहत आहेत.
हेही वाचा - Sangli Family Suicide Case : सुसाइड नोटने वाढवली प्रकरणाची व्याप्ती; तपास सुरु