ETV Bharat / bharat

Sonali Phogat Murder Case : सोनाली फोगाट खून प्रकरण : मारेकरी सुधीर संगवानला गोवा न्यायालयाकडून जामीन मंजूर

सोनाली फोगाट यांचा गोव्यातील अंजुना बीचवरील हॉटेलमध्ये खून करण्यात आला होता. सोनाली फोगाट यांना अंमली पदार्थाचा ओव्हरडोस देऊन त्यांचा खून केल्याचा आरोप सीबीआयच्या आरोपपत्रात करण्यात आला आहे. यातील मुख्य आरोपी सुधीर संगवान याला गोव्याच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

Sonali Phogat Murder Case
सोनाली फोगाट खून प्रकरण
author img

By

Published : Jun 24, 2023, 4:15 PM IST

पणजी : हरियाणातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्या सोनाली फोगट यांचा गोव्यातील अंजुना समुद्र किनाऱ्यावरील हॉटेलमध्ये खून करण्यात आला होता. या खुनातील मुख्य आरोपी सुधीर सांगवान याला गोव्यातील न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सोनाली सोफाट यांचा ऑगस्ट 2022 मध्ये अंजुना बीचवरील समुद्र किनाऱ्यावरील हॉटेलमध्ये खून करण्यात आला होता. आरोपी सुधीर सांगवान याने त्याच्या साथीदारासोबत सोनाली फोगाटला ड्रग्ज पाजून मारले होते.

सुधीर सांगवान याला या अटींवर दिला जामीन : सुधीर सांगवान हा सोनाली फोगाट खून प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्याने गोव्याच्या जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी सुधीर सांगवान याला एक लाख रुपयांच्या जामीनपत्रावर जामीन मंजूर केला. न्यायालयाने सुधीर सांगवानला राज्याबाहेर जाण्यास मनाई केली असून दर शुक्रवारी सीबीआय ( CBI ) समोर हजर राहण्याचे निर्देश दिल्याची माहिती सुधीर सांगवानच्या वकिलाने दिली आहे.

गोवा पोलिसांनी केली होती अटक : सोनाली फोगाट या हरियाणातून गोव्यात सुट्टी घालवण्यासाठी आल्या होत्या. यावेळी सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग हे दोघेही त्यांच्यासोबत होते. मात्र 22 आणि 23 ऑगस्टच्या रात्री सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांनी तिला एका रिसॉर्टमध्ये नेले त्यानंतर तिथे नंतर नाईट क्लबमध्ये पार्टी करताना सोनाली फोगाट यांना जबरीने अंमली पदार्थ पाजल्याचा आरोप करण्यात आला होता. अंमली पदार्थाच्या ओव्हरडोसमुळे सोनाली फोगाट यांचा मृत्यू झाला.

सीबीआयने केले 1 हजार पानाचे आरोपपत्र दाखल : भाजपनेत्या सोनाली फोगाट यांचा खून झाल्यामुळे देशभर खळबळ उडाली होती. याप्रकरणी आरोपींवर कारवाई करण्यासाठी देशभरात आंदोलनने करण्यात आली. त्यामुळे हे हायप्रोफाईल प्रकरण असल्याने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. सीबीआयने या प्रकरणी सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांना अटक करुन गुन्ह्याचा तपास घेतला होता. सीबीआयने या प्रकरणी 1 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात सीबीआयने दोन्ही आरोपींवर भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 302 नुसार मापुसा न्यायालयात हे आरोपपत्र दाखल केले होते.

हेही वाचा -

Sonali Phogat Case सोनाली फोगाट हत्या प्रकरणातील तीनही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी

  1. Sonali Phogat Murder Case सोनाली फोगाट हत्याकांडात महत्त्वाच्या नोंदी असणाऱ्या तीन डायऱ्या गोवा पोलिसांनी केल्या जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.