बैतूल Software Engineer Change Gender : मध्य प्रदेशातील बैतूलमधून लिंग बदलाचं एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आलंय. जिथं व्यवसायानं सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या मुलीवर शस्त्रक्रिया करून ती मुलगा झाली आहे. बैतूलची सॉफ्टवेअर इंजिनीयर स्वाती आता शिवाय बनलाय. इतकच नाही तर तो आता लवकरच मुलीशी लग्न करणार आहे.
युट्यूबवरून मिळाली प्रेरणा : तो म्हणाला की, मी स्वतः माझ्या मुलीच्या शरीरावर खूश नव्हतो. एकदा मी युट्यूबवर आर्यन पाशाला पाहिलं. आर्यन मुलीतून मुलगा झाला आणि नंतर बॉडी बिल्डर बनला. यानंतर मीही मुलगा होण्याचा निर्णय घेतला आणि लिंग बदलून मी स्वातीचा ‘शिवाय’ झालो.
शस्त्रक्रिया करणारी जिल्ह्यातील पहिली व्यक्ती : शिवाय सूर्यवंशी यानं सांगितलं की, लिंग बदल शस्त्रक्रियेमध्ये तीन टप्पे असतात. त्यानंतर मुलगा मुलगी होते आणि मुलगी मुलगा होतो. तसंच दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया झाल्याचं त्यानं सांगितलं. डॉक्टर नरेंद्र कौशिक यांनी त्याची शस्त्रक्रिया केली आहे. 2020 मध्ये स्वातीची पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली, ज्यामध्ये हार्मोन्स बदलतात. तसंच आवाज बदलतो आणि दाढी वाढू लागते.
शस्त्रक्रियेची किंमत सुमारे 10 लाख रुपये : प्रत्येक शस्त्रक्रियेनंतर तीन महिन्यांचा विश्रांतीचा कालावधी असतो. त्याने सांगितलं की, काही महिन्यांपूर्वीच माझी चौथी शस्त्रक्रिया झाली होती. ज्यामध्ये त्वचेत बदल झाला. यानंतर मी विश्रांती घेतली आणि आता गेल्या एक आठवड्यापासून मी पुन्हा इंदुरमध्ये नोकरीला सुरुवात केली आहे. या शस्त्रक्रियेसाठी सुमारे 10 लाख रुपये खर्च आला. तसंच शिवायला आधीच शस्त्रक्रिया करायची होती. परंतु आर्थिक परिस्थितीमुळं ते शक्य झालं नाही. आता आयुष्मान योजनेंतर्गत शस्त्रक्रियाही करता येणार आहे, असंही त्यानं सांगितलं.
शस्त्रक्रियेनंतर मी आनंदी आहे : शस्त्रक्रिया झाल्यानंतर मी खूप आनंदी आहे. आता मला वाटतंय की मला हवं ते शरीर मिळालंय. आता मी मुलगी शोधून लवकरच लग्न करीन, असंही शिवाय म्हणाला. शिवायच्या कुटुंबातील लोकही आनंदी आहेत. शिवायचा मोठा भाऊ कृष्णा सूर्यवंशी म्हणाला की, सुरुवातीला आमचा विरोध होता. पण नंतर संपूर्ण कुटुंबानं सहकार्य केलं. आता मला आणखी एक भाऊ मिळालाय. अगोदर आम्ही पाच भावंडं होतो. मी आणि 4 बहिणी. स्वाती ही सर्वात लहान बहीण होती. पण आता स्वाती शिवाय झाल्यामुळं आम्ही दोन भाऊ आणि तीन बहिणी झालोत.
कागदपत्रांमध्येही नाव बदलले : यापूर्वी शिवायच्या कागदपत्रांवर स्वाती नाव होतं. शस्त्रक्रियेनंतर त्याच्या सर्व कागदपत्रांवरील नाव बदलण्यात आलंय. शस्त्रक्रियेनंतर जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत कळवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्हाधिकाऱ्यांनीही पत्र दिलं होतं. त्यांच्या मदतीने दस्तऐवजातील नाव बदललं आहे. दरम्यान, आता शिवायनं लिंग बदलाची शस्त्रक्रिया करू इच्छिणाऱ्या लोकांना जागरूक करण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा -