हैदराबाद: एका मल्टीनॅशनल कंपनीत टेक्निकल तज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्या एका सॉफ्टवेअर अभियंत्याने गचीबोवली येथील फ्लॅटमध्ये पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली ( Software Engineer Commits Suicide ) आहे. जम्मू-काश्मीरची रहिवासी असलेली 27 वर्षीय क्रिती संभल ही हैदराबादमधील अॅमेझॉन कंपनीत तांत्रिक तज्ञ म्हणून तिच्या दोन मैत्रिणींसह नानकरामगुडा येथील एका अपार्टमेंटमध्ये राहत होती. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
क्रितीची( software engineer Kriti Sambhal ) एक रूममेट दोन दिवसांपूर्वी दिल्लीला गेली होती, तर दुसरी रूममेट फ्लॅट बंद करून बुधवारी ऑफिसला गेली होती. यादरम्यान फ्लॅटमध्येच तिची मैत्रीण क्रिती तिच्या खोलीत असल्याचे तिला माहीत नव्हते. रूममेट ऑफिसमध्ये गेल्यानंतर क्रितीने तिचा मित्र सचिन कुमारला मेसेज केला की, ती आत्महत्या करणार आहे. हा संदेश मिळाल्यानंतर सचिन तात्काळ तिच्या फ्लॅटवर पोहोचला आणि फ्लॅट बंद असल्याचे पाहिले.
सचिनने दरवाजा ठोठावला पण प्रतिसाद मिळाला नाही, यावर सचिनने क्रितीच्या फोनवर कॉल केला पण फोन उचलला नाही. त्यानंतर सचिनने तिच्या मैत्रिणीला फोन केला आणि चावी घेण्यासाठी तिच्या ऑफिसमध्ये गेला, त्यानंतर सचिनने फ्लॅटचा दरवाजा उघडला तोपर्यंत क्रितीचा मृत्यू झाला होता. क्रितीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
हेही वाचा -Self Marriage : तरुणी करणार स्वतःशीच विवाह, 'या' दिवशी घेणार सप्तपदी