ETV Bharat / bharat

विधानसभा निवडणूक 2023 च्या निकालासंदर्भात 'मीमफेस्ट' सुरू, पाहा नेमकं काय म्हणतायत 'युजर्स'

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 3, 2023, 2:03 PM IST

Assembly Election 2023 : तेलंगाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. त्यासाठी चारही राज्यात सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या मजेशीर पोस्ट शेअर केल्या जात आहेत, जे वाचल्यानंतर तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.

social media reactions on assembly election 2023 results
विधानसभा निवडणूक 2023 च्या निकालासंदर्भात 'मीमफेस्ट' सुरू

नवी दिल्ली Assembly Election 2023 : मिनी लोकसभा म्हणून बघितल्या जात असलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगाणा या राज्यांचा निकाल आज (3 डिसेंबर) जाहीर होत आहे. तर मिझोरममध्ये सोमवारी 4 डिसेंबरला मतमोजणी होईल. दरम्यान, या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत असल्याचं बघायला मिळतंय.

छत्तीसगड, तेलंगाणा, राजस्थान आणि मध्य प्रदेश या चारही राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे संपूर्ण निकाल लवकरच स्पष्ट होतील. मात्र, त्यापूर्वी सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या फनी पोस्ट व्हायरल होत आहेत, ज्या पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. या पोस्टमध्ये युजर्सनी विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात जोक्स, फोटोज अन् व्हिडिओज शेअर केले आहेत.

कोण बाजी मारणार? : 2023 च्या विधानसभा निवडणुका संपल्या असून मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगाणा येथे मतमोजणी सुरू झाली आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार तेलंगाणामध्ये काँग्रेसला आघाडी मिळताना दिसत आहे, तर मध्य प्रदेशमध्ये भाजपाला आघाडी मिळत असल्याचं दिसत आहे. तसंच राजस्थानमध्ये झालरापाटन मतदारसंघातून भाजपाच्या फायरब्रँड नेत्या तथा माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी आपला दबदबा कायम ठेवत तब्बल 48 हजारांहून अधिक मतांनी दणदणीत विजय मिळवलाय. तर तेलंगाना विधानसभा निवडणुकीत भारत राष्ट्र समितीला मोठा फटका बसल्याचं स्पष्ट होत आहे. सध्या हाती आलेल्या आकडेवारीमध्ये काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे. भारत राष्ट्र समिती केवळ 41 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेसनं तब्बल 66 जागांवर मुसंडी मारली आहे. त्यामुळे मतदारांनी भारत राष्ट्र समितीकडं पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे.

मतमोजणी सुरू होताच लोकांनी फेसबुक आणि एक्सवर (ट्विटर) आपली मतं मांडायला सुरुवात केली. तसंच सोशल मीडियावर मजेशीर मीम्स आणि प्रतिक्रियांचा पूर आल्याचं पाहायला मिळतय.

हेही वाचा -

  1. Election Results 2023 Live Updates: भाजपाचा विजय हा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचा, भाजपाच्या धोरणांचा विजय-युपी उपमुख्यमंत्री
  2. राजस्थानात सत्ता बदलाची परंपरा कायम राहणार? सुरुवातीच्या मतमोजणी फेरीमध्ये भाजपाची आघाडी
  3. तेलंगणात सुरुवातीच्या मतमोजणीत कॉंग्रेस आघाडीवर, काँग्रेसचे निरीक्षक माणिकराव ठाकरे यांनी कुणाला दिलं श्रेय?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.