श्रीनगर - रविवारी सकाळपासूनच काश्मीर आणि लडाखमध्ये मध्यम ते जोरदार बर्फवृष्टी होत आहे. तर, जम्मू विभागात पावसाने हजेरी लावली आहे. यादरम्यान, रात्री ढगाळ आकाश असल्याने जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये किमान तापमानात सुधारणा झाली.
रविवारी व सोमवारी खोऱ्याच्या विविध भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान कार्यालयाने वर्तवला आहे. हिमवृष्टीमुळे महामार्गाच्या जवाहर बोगद्याच्या भागात बर्फ जमा झाले आहे. त्यामुळे श्रीनगर-जम्मू महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
हेही वाचा - अरुणाचल सीमेवरील फार्वर्ड चौक्यांची सरसेनाध्यक्षांकडून पाहणी
या वेळी, श्रीनगर आणि पहलगाममध्ये किमान तापमान वजा 1.5 अंश सेल्सियस व गुलमर्ग येथे वजा 0.5 अंश सेल्सियस असे होते. लडाखमधील लेह शहरात किमान रात्रीचे तापमान उणे 12.7, कारगिल मध्ये उणे 16.6 आणि द्रास येथे उणे 22.4 नोंदले गेले. जम्मू शहरात किमान 11.7, कटरामध्ये 9.5, बटोटेमध्ये 1.5, बेनिहालमध्ये 0.5 आणि भद्रवाह 0.6 तापमानाची नोंद झाली.
दोन्ही केंद्रशासित प्रदेशांमध्ये सध्या 'चिल्लई कलां' म्हणजेच भीषण थंडीच्या 40 दिवसांचा कालावधी सुरू आहे. ही थंडी 31 जानेवारीला संपेल.
हेही वाचा - 'तपास यंत्रणा माझ्या वडिलांच्या थडग्याचंही ऑडिट करतायेत'