मुंबई - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी ( Smriti Irani ) यांनी टपाल खात्यातून पैसे काढण्यासाठी एका वृद्ध महिलेला मदत ( Smriti Irani Helps Elder Woman ) केली आहे. मंगळवारी पोस्टाच्या अधिकाऱ्यांनी स्वत: त्या वृद्ध महिलेच्या घरी जाऊन पैसे महिलेच्या स्वाधीन केले. वाराणसीच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी ( Smriti Irani In Bhimnagar ) स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्यासाठी भीमनगरमध्ये पोहोचल्या होत्या. याची माहिती स्थानिक रहिवासी, वृद्ध महिला चिंता देवी यांना मिळाली. त्यांनी स्मृती इराणी यांना भेटण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा भाजपा नेत्यांनी चिंता देवी यांची भेट स्मृती इराणी यांच्याशी करून दिली. त्यावेळी त्यांनी स्मृती इराणी यांना त्यांच्या अडचणीविषयी सांगितले.
पतीने मुलीच्या लग्नासाठी पोस्ट ऑफिसमध्ये पैसे जमा केले होते. मात्र, पोस्ट ऑफिसमधील घोटाळ्यामुळे पैसे निघत नाहीत. त्याचबरोबर मुलगी सुमनच्या १५ जून रोजी होणार्या लग्नाबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. तसेच पैसे काढण्याची विनंती केली. यावर स्मृती इराणी यांनी प्रांतीय नगरसेवक दिनेश यादव यांना पोस्ट ऑफिस सुरू होताच चिंता देवींना तिथे घेऊन जा आणि पैसे काढण्यासाठी मदत करा आणि काही अडचण आल्यास त्या स्वत: पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचतील, अशी सूचना केली.
केंद्रीय मंत्र्यांच्या सूचनेवरून नगरसेवक दिनेश दुपारी चिंता देवी यांना घेऊन पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचले. तेव्हा फाइल तेथे सापडली नसल्याचे सांगण्यात आले. यावर नगरसेवकाने भाजपचे महानगर महासचिव नवीन कपूर यांना टपाल अधीक्षक सीपी तिवारी यांच्याशी बोलण्यास सांगितले. सरचिटणीसांनी फोन करूनही टपाल अधीक्षकांनी पैसे काढण्यासाठी 15 दिवस लागतील, असे बेधडकपणे सांगितले. यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी स्वत: टपाल अधीक्षकांशी चर्चा केली असता, त्यांनी तेथेही गोंधळ सुरू केला. यावर स्मृती इराणी यांनी केंद्रीय राज्यमंत्री (पोस्ट) देवी सिंह चौहान यांना फोन करून संपूर्ण घटनेची माहिती दिली. अखेर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मध्यस्थीनंतर टपाल खात्याने चेक बनवून चिंता देवी यांना दिला.
हेही वाचा - बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींचीच बाजी तर कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल