लुधियाना - वय केवळ सहा वर्ष चार महिने आणि स्केटिंगमध्ये भन्नाट वेग. अनेक लोक स्ट्रेट स्केटिंग करण्यासाठीही शरीराचे संतुलन करू शकत नाहीत, परंतु लुधियाना( Ludhiana) चा हा बालक प्रणव चौहानने बॅकवर्ड स्केटिंगचा नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
सहा वर्षाच्या प्रणवने असा कारनामा करून दाखवला आहे, जे कोणासाठीही स्वप्नवत असते. सुरुवातीला स्केटिंग हा प्रणवचा छंद होता. मात्र आता स्केटींग हा त्याचा प्राण झाला आहे. सहा वर्षाच्या प्रणवने सराभानगर लॅय्यर व्हॅलीमध्ये डोळ्यावर पट्टी बांधून 1 तास 16 मिनिटात 16 किलोमीटर स्केटिंग करून नवा वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. प्रणवने सांगितले की, तो वयाच्या तीन वर्षापासून स्केटिंग करत आहे. प्रणव लिंबो स्केटिंग व मॅराथॉन स्केटिंग करतो. प्रणवने राज्य पातळीबरोबरच राष्ट्रीय पातळीवरील अनेक मेडल जिंकली आहेत. स्केंटिंगमध्ये नवनवे विक्रम करण्यासाठी प्रणव दररोज 2 तास सराव करतो.
प्रणवचे वडील सुरिंदर सिंह चौहान यांनी सांगितले की, प्रणवने सकाळी सात वाजल्यापासून सवा आठ वाजेपर्यंत 16 किलोमीटर स्केटिंग केली आहे. आता तो लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डसाठी अर्ज करणार आहेत. प्रणव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी प्रयत्न करत आहे. ब्लाइंड फोल्डमध्ये खेळाडूंचा रेकॉर्ड 14 किमी पर्यंत आहे. त्या सर्व मुलांचे वय सहा वर्षाहून अधिक आहे. प्रणव त्यांच्याहून लहान आहे.
प्रणव चौहानने लिम्बो स्केटिंगमध्ये नॉन स्टॉप 29 मिनिट 42 सेकंदात 61 राउंड लगाकर इंटरनॅशनल बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. त्याचबरोबर प्रणवने फर्स्ट मोरंग इंडो नेपाळ ओपन रोलर स्केटिंग चँपियनशिपमध्ये दोन गोल्ड, स्पीड स्केटिंग चँपियनशिपमध्ये 200 मीटर आणि 400 मीटरमध्ये 2 गोल्ड, किडो किट स्पोर्ट्स अकादमीच्या स्पीड स्केटिंगमध्ये 200 मीटरमध्ये गोल्ड आणि 400 मीटरमध्ये सिल्वर, डिस्ट्रिक्ट स्केटिंग चँपियनशिपमध्ये 200 मीटरमध्ये सिल्वर, चंडीगडमध्ये 13-14 एप्रिल रोजी झालेल्या ऑल इंडिया रोलर स्केटिंग चँपियनशिपमध्ये 300 आणि 500 मीटरमध्ये गोल्ड मेडल जिंकले आहे. यामध्ये प्रणवने रिले रेसमध्ये अन्य खेळाडूंसोबत अंडर-6 मध्ये लाँगेस्ट रिले रेसमध्ये इंटरनॅशनल बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केले.
हे ही वाचा - Google Boy : अडीच वर्षाच्या बालकाची उत्तरे ऐकून डोकं जाईल चक्रावून.. मेमरीत फीड जगभरातील जनरल नॉलेज
प्रणवचे यश पाहून आता दुसऱ्या मुलांचे आई-वडीलही आपल्या मुलांना स्केटिंग कोचिंगला पाठवू लागले आहेत. अमृत कौर यांनी सांगितले की, प्रणवकडे पाहून आम्ही आमच्या मुलांना खेळासाठी प्रोत्साहन देत आहोत. मुलेही प्रणवसोबत स्केटिंग करून खुश आहेत. ते प्रणला आपला रोल मॉडल मानतात. प्रणवचे वडील सुरेंदा यांनी सांगितले की, काही करून दाखवण्याच्या उमेदीने मी खेळाकडू आकृष्ट झालो होतो, मात्र कौटुंबिक कारणांमुळे मी काही खास करू शकलो नाही. आता आपल्या मुलाला चांगला खेळाडू बनवणे हेच स्वप्न आहे.