झुंझनू (राजस्थान) - राजस्थानातील झुंझनू जिल्ह्यातील खेतडी तालुक्यात चिरानी गावात एकाच मंडपात सहा सख्ख्या बहिणींनी लग्नगाठ ( Six Sisters Marriage in Same Tent ) बांधल्याची घटना समोर आली आहे. स्कुलबस चालक पित्याने एकाच दिवशी एकाच वेळी सहा सख्ख्या बहिणींची लग्नगाठ बांधल्याची अनोखी घटना ( Unique Marriage ) समोर आली आहे. पित्याने अत्यंत सन्मानपूर्वक पद्धतीने आपल्या मुलींना सासरी पाठवले आहे.
सहाही मुलींनी घेतले एकत्र फेरे -
आतापर्यंत तुम्ही दोन, तीन बहिणींची एकत्र लग्न पाहिली किंवा ऐकली आहे. परंतु झुंझुनू जिल्ह्यातील खेतडीजवळील चिरानी गावात सहा बहिणींचे एकत्र लावलेले लग्न हा चर्चेचा विषय ठरला आहे. सात मुलींपैकी सहा मुलींचे एकत्र लग्न केली आहेत. सहाही मुलींनी एकत्र फेरे घेतल्यानंतर त्यांनी एकत्र घोड्यांवर बसवून त्यांची वरात देखील काढली.
मुलींची पाठवणी करताना गावकरीही भावूक -
राजस्थानातील झुंझनू जिल्ह्याच्या खेतडी तालुक्यातील चिरानी गावातील ही हटके लग्नाची घटना आहे. येथील एका स्कुलबस चालकाला एकूण सात मुली आणि एक मुलगा आहे. त्यांनी आपल्या सहा मुलींचे एकत्रित लग्न लावले आहे. सहा मुलींचे एकत्र लग्न केले असले तरी, त्यांनी लग्नात कोणत्याही गोष्टची कमी पडू दिली नाही. या लग्नासाठी तीन गावातून वऱ्हाडी मंडळी आले होते. या अनोख्या लग्नात संपूर्ण गावही उत्साहाने सहभागी झाले होते. त्याचवेळी मुलींची पाठवणी करताना कुटुंब आणि गावकरी भावूक झाले होते.
हेही वाचा - baby born with two heads : रांची येथे महिलेने दिला दोन डोके असलेल्या मुलाला जन्म