ETV Bharat / bharat

Deepak Dalvi Face Blackened : दीपक दळवी यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या अंगावर ॲसिड शाई फेकण्यात आली. (Maharashtra Ekikaran Samiti) तसेच त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपही त्यांनी केला आहे. या घटनेनंतर टिळकवाडी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Belagavi Bandh) दीपक दळवी यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

दीपक दळवी यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

author img

By

Published : Dec 14, 2021, 12:04 PM IST

Updated : Dec 14, 2021, 12:30 PM IST

बेळगाव - मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या अंगावर ॲसिड शाई फेकण्यात आली. तसेच त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपही त्यांनी केला आहे. (Deepak Dalvi) या घटनेनंतर टिळकवाडी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दीपक दळवी यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. (Maharashtra Ekikaran Samiti Stand) अशोक दड्डी व संतोषकुमार देसाई यांच्यासह अन्य सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल (दि. 13 डिसेंबर)रोजी बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा सुरू होता. यावेळी हा शाईफेकण्याचा प्रकार घडला.

व्हिडिओ

समितीकडून बेळगाव बंदची हाक

गेल्या अनेक वर्षांपासून सीमाभागातील मराठी भाषीक आपल्या न्याय हक्कांसाठी लढा देत आहेत. लोकशाहीच्या मार्गाने आजपर्यंत लढत आले आहेत. मात्र, वारंवार कन्नड सरकारकडून त्यांच्यावर अन्याय होत आला आहे. दरवर्षी येथील बेळगावमध्ये कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन होत असते. याच अधिवेशनावेळी मराठी भाषिकही 2006 सालापासून समांतर असा मेळावा घेत असतात. याच मेळाव्या दरम्यान, एका कन्नड रक्षक वेदिकेच्या काही कार्यकर्त्यांनी एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाई फेकली. या संतापजनक घटनेचा सर्वच स्थरातून निषेध व्यक्त केला जात असून आज बेळगावसह सीमाभागात बंदची सुद्धा हाक देण्यात आली आहे.

बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; गल्लोगल्ली बंद बाबत फलकांद्वारे आवाहन

महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर झालेल्या शाईफेकीनंतर काल बेळगावसह सीमाभागात बंदची हाक देण्यात आली होती. त्यानंतर बेळगावसह सीमाभागात गल्लोगल्ली बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. प्रत्येक ठिकानी फलकांद्वारे बंदची हाक देण्यात आली असून कर्नाटकी गुंडगिरीचाही निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

अशा कृत्यामुळे चळवळ थांबणार नाही

घडलेल्या या घटनेचा महाराष्ट्र एकीकरण समितीकडून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. अशा प्रकारच्या घटनेमुळे आमची चळवळ थांबणार नाही. याउलट मोठ्या जोमाने ही चळवळ पुढे जाईल असेही यावेळी एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांनी काल म्हटल आहे. दरम्यान, बेळगाव पोलिसांनी संबंधित शाई फेकलेल्या अज्ञात व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. तसेच, दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - राहुल गांधींना हिंदूत्वाचा दिवा पेटविता आला तर स्वागतच - सामना

Last Updated : Dec 14, 2021, 12:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.