हैदराबाद - तेलंगणातील कोट्टागुडम आणि छत्तीसगड सीमेवरील (Telangana-Chhattisgarh border ) सुकमा जिल्ह्यात नक्षलवादी आणि सुरक्षादलादरम्यान चकमक ( Telangana-Chhattisgarh border Encounter ) झाली. यामध्ये 6 नक्षलवादी ठार झाले आहेत. तेलंगणा ग्रेहाऊंड्स आणि छत्तीसगड पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
चार्ला झोनपासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुर्नवल्ली-पेसरलापाडू वनक्षेत्रात ही चकमक झाल्याची माहिती आहे. 6 नक्षलवाद्यांपैकी 4 महिला आहेत आणि एक चार्ला एरियातील मिलिशिया कमांडर मधु आहे. पोलिसांनी नक्षलवाद्यांचे मृतदेह जप्त केले असून अद्याप शोध मोहीम सुरू आहे.
तेलंगणाचे कोथागुडेम एसपी सुनील दत्त ( Kothagudem SP Sunil Dutt) यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर घटनास्थळी सतत शोधमोहीम सुरू आहे. तेलंगणा आणि छत्तीसगडच्या किस्ताराम पीएस सीमावर्ती भागातील जंगल परिसरात झालेल्या चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाले आहेत, असे एसपी सुनील दत्त यांनी म्हटलं.
हेही वाचा - Anil Deshmukh Remanded In Judicial Custody: अनिल देशमुख यांना पुन्हा जेल की, बेल? आज फैसला