ETV Bharat / bharat

Sidhi Urination Case : 'तो गावचा पंडित आहे, त्याला सोडा', आदिवासी व्यक्तीवरील लघुशंका प्रकरणात आला नवा ट्विस्ट - आदिवासी व्यक्तीच्या चेहऱ्यावर लघवी

सीधी येथे आदिवासी व्यक्तीवर लघुशंका केल्याच्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. आधी पीडिताने व्हिडिओ आपला नसल्याचे म्हटले होते. आता मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर त्याने आरोपी भाजप नेता प्रवेश शुक्लाला सोडण्याची मागणी केली आहे.

Sidhi Urination Case
सीधी लघवी प्रकरण
author img

By

Published : Jul 8, 2023, 5:03 PM IST

पहा व्हिडिओ

सीधी (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशातील सीधी येथे झालेल्या लघुशंकेच्या घटनेबाबत पीडित आदिवासी तरुणाने औदार्य दाखवत आरोपी भाजप नेता प्रवेश शुक्लाच्या सुटकेची मागणी केली आहे. 'तो आमच्या गावचा पंडित आहे. त्यामुळे त्याला सोडण्यात यावे,' असे पीडिताने म्हटले आहे. त्याचे हे वक्तव्य ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

'तो पंडित आहे, त्याला सोडा' : सीधी येथील लघुशंकेच्या घटनेतील पीडित दशमत रावत याने आरोपी भाजप नेता प्रवेश शुक्लाच्या सुटकेची मागणी करताना म्हटले आहे की, 'माझी मागणी आहे की, जी चूक झाली ती झाली. आता त्याला सोडा. त्याच्याकडून नकळत चूक झाली. आता त्याला त्याची चूक कळली आहे. तसेच तो आमच्या गावचा पंडित आहे, त्यामुळे त्याला आता सोडून द्या'. पीडित पुढे म्हणाला की, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्याला 6.50 लाख रुपये दिले (5 लाख सहायता निधी आणि 1.50 लाख घरासाठी). आता त्याची एकच मागणी आहे की, प्रवेश शुक्लाला सोडण्यात यावे.

भाजप आपल्या नेत्याला वाचवत आहे? : भाजप नेता प्रवेश शुक्लाचा एका आदिवासी व्यक्तीच्या चेहऱ्यावर लघुशंका करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीला चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर पीडिताने तो व्हिडिओमध्ये असल्याचे स्पष्टपणे नाकारले होते. मात्र नंतर खूप विचारणा केल्यानंतर त्याने व्हिडिओमध्ये असल्याचे मान्य केले. पीडित दशमतने नुकतीच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता लोक सोशल मीडियावरून भाजपवर आरोप करत आहेत की, आपल्या नेत्याला वाचवण्यासाठी सरकारची ही नवी युक्ती आहे.

मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली : मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पीडित दशमत रावतसोबत झालेल्या लघुशंका घटनेबद्दल माफी मागितली आहे. मुख्यमंत्र्यांनी पीडितचे पाय धुवून आणि त्याला भोपाळच्या सीएम हाउसमध्ये बोलावून मिठी मारून सन्मान केला होता. दशमत रावत याला आर्थिक मदतही करण्यात आली आहे. दुसरीकडे, आरोपी प्रवेश शुक्लावर IPC आणि SC/ST (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत आरोप लावण्यात आले आहेत. तसेच त्याच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (NSA) देखील कारवाई करण्यात आली आहे. तो सध्या तुरुंगात आहे. यासोबतच शुक्ला याचे सीधी येथील घर हे बेकायदा बांधकाम असल्याचे सांगत पाडण्यात आले आहे.

हेही वाचा :

  1. Madhya Pradesh Urination case : मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी आदिवासीचे पाय धुवून मागितली माफी
  2. MP Urinating Case : आदिवासी तरुणावर लघवी केल्याचे प्रकरण, भाजप नेत्याच्या घरावर चालला बुलडोझर!
  3. Urination On Tribal Man : भाजप नेत्याचे किळसवाणे कृत्य!, दारुच्या नशेत आदिवासी व्यक्तीच्या चेहऱ्यावर केली लघुशंका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.