कानपूर : उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये पोलीस ठाण्याच्या बिधानू क्षेत्रांतर्गत खडेश्वर गावात रविवारी एका दुकानदाराचा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवलेल्या अवस्थेत आढळून ( dead body hidden in freeze ) आला. याची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आणि घटनास्थळावरून पुरावे गोळा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ( Police investigating murder case) पाठवला.
खडेश्वरमध्येच किराणा दुकान : एसपी तेज स्वरूप सिंह माहिती देताना म्हणाले की बिधानू पोलीस स्टेशन हद्दीतील खडेश्वर गावात राहणारे कुबेर सिंह (52) यांचे खडेश्वरमध्येच किराणा दुकान होते. कुबेर सिंह यांच्या पत्नीचे 15 वर्षांपूर्वी निधन झाले होते आणि मुलीचे लग्न झाले होते. सध्या कुबेर सिंह खडेश्वर येथील त्यांच्या घरात पुतण्यासोबत राहत होते. पुतण्या नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर असायचा. गेल्या 4 दिवसांपासून कुबेर सिंग यांनी किराणा दुकान उघडत नव्हते ते बाहेरही दिसत नव्हते.
मृतदेह डीप फ्रीजरमध्ये ठेवला : तेव्हा स्थानिक लोकांनी कुबेर सिंगच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. यानंतर कुटुंबीय घरी आले आणि त्यांनी कुबेर सिंह यांचा मृतदेह घरात ठेवलेल्या डीप फ्रीजरमध्ये ठेवल्याचे पाहिले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून फॉरेन्सिक टीमला पाचारण करून तपास सुरू केला. रविवारी ही घटना उघडकीस ( Shopkeeper murder in Kanpur ) आली.