ETV Bharat / bharat

Shiv Sena : धाकधूक वाढली.. शिवसेनेनं दिल्लीतील महत्त्वाच्या बैठकीकडे फिरवली पाठ - राष्ट्रपती पद विरोधक उमेदवार

मंत्री एकनाथ शिंदे बंड करण्याच्या तयारीत असल्याचे लक्षात आल्यानंतर शिवसेनेत अंतर्गत धाकधूक वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत शरद पवारांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या विरोधीपक्षांच्या बैठकीला जाणार नसल्याचे स्पष्ट केले ( Shiv Sena skipped opposition meet ) आहे.

sanjay raut
संजय राऊत
author img

By

Published : Jun 21, 2022, 11:42 AM IST

नवी दिल्ली : महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या शक्यतेने धाकधूक वाढली आहे. दुसरीकडे वसेनेचे नेते राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी त्यांचा संयुक्त उमेदवार निश्चित करण्यासाठी मंगळवारी होणारी विरोधी पक्षांच्या बैठकीला जाणार होते. मात्र त्यांनी बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतला ( Shiv Sena skipped opposition meet ) आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय राऊत उपस्थित राहणार होते, परंतु “त्यांनी त्यांचा दिल्ली दौरा रद्द केला आहे,” असे पक्षाच्या एका कार्यकर्त्याने सांगितले. यासह राऊत यांनीही पत्रकार परिषदेत दिल्लीत जाणार नसल्याचे सांगितले.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या 10 आमदारांशी संपर्क साधल्याने महाराष्ट्र सरकार संकटात सापडले आहे. शिंदे हे गुजरातच्या सुरतमध्ये असल्याचे समजते, ते पक्षाकडून बाजूला झाल्यामुळे नाराज आहेत.

बैठकीस सुरुवात : राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी 17 विरोधी पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. शरद पवार यांनी एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनाही बैठकीचे निमंत्रण दिले आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या रणनीतीबाबत आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी १७ पक्षांच्या विरोधी नेत्यांच्या बैठकीसाठी सीपीआय नेते डी राजा पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) नेते सीताराम येचुरी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा उमेदवार ठरवण्यासाठी विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.

हेही वाचा : Mp Sanjay Raut Statement : भूकंप होणार नाही, फक्त संशयास्पद वातावरण निर्माण केले - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.