ETV Bharat / bharat

Attacked On Shiv Sena Samajwadi Leader: शिवसेनेचे समाजवादी नेते राजीव महाजन यांच्यावर पंजाबमध्ये गोळ्या झाडून हल्ला - राजीव महाजन यांच्यावर हल्ला

शिवसेना समाजवादी पक्षाचे नेते राजीव महाजन यांच्यावर बटाला येथे भरदिवसा गोळ्या झाडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात शिवसेना समाजवादीचे नेते यांच्यासह त्यांचा भाऊ आणि मुलगाही जखमी झाले आहेत.

Attacked On Shiv Sena Samajwadi Leader
राजीव महाजन यांच्यावर गोळ्या झाडून हल्ला
author img

By

Published : Jun 25, 2023, 8:54 AM IST

बटाला : बटाल्यात दिवसेंदिवस हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. अशाच एका घटनेत 2 जणांनी बटाला सिटी रोडवर एका इलेक्ट्रॉनिक शोरूमच्या मालकासह 3 जणांवर गोळीबार केला. दरम्यान, दुकानदार शिवसेना समाजवादी नेते राजीव महाजन, त्यांचे भाऊ अनिल महाजन आणि मुलगा मानव महाजन जखमी झाले. जखमींना उपचारासाठी बटाला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अमृतसरला रेफर करण्यात आले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

राजीव महाजन यांची प्रतिक्रिया : दुकानदार राजीव महाजन हे शिवसेनेचे समाजवादी संघटन मंत्री आहेत. महाजन म्हणाले की, माझे कोणाशीही वैर नाही. त्यांनी सांगितले की, 12 वाजण्याच्या सुमारास एक तरुण आला आणि त्याने एलईडी खरेदी करायचे असल्याचे सांगून तो तरुण पुन्हा दुकानातून निघून गेला. त्यानंतर त्या तरुणासोबत आणखी एक तरुण आला आणि त्यांनी आमच्यावर गोळीबार सुरू केला, त्यामुळे माझा भाऊ आणि मुलगा गंभीर जखमी झाले.

या प्रकरणाच्या तपासात पोलीस सहभागी : या घटनेची माहिती मिळताच डीएसपी सिटी ललित कुमार आणि इतर पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. या घटनेबाबत माहिती देताना ते म्हणाले की, या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे. ते म्हणाले की, सध्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे आणखी सीसीटीव्ही शोधले जात आहेत. त्यानंतर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेमुळे नागिरकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा व सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

हेही वाचा :

  1. Accused Arrested From Swamp: गुन्ह्यांची हॉफ सेंचुरी पार करणाऱ्या आरोपीला फिल्मी स्टाईलने घेतले ताब्यात
  2. Pune Crime News: पत्रकारावर पिस्तुलातून जीवघेणा हल्ला; गुन्हेगारांना स्वारगेट पोलिसांनी केले जेरबंद, आरोपींमध्ये विधी संघर्ष बालकांचा समावेश
  3. Bihari labour shot dead दहशतवाद्यांच्या निशाण्यावर पुन्हा परप्रांतीय, बांदीपोरा भागात बिहारी मजुराची गोळ्या झाडून हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.