ETV Bharat / bharat

दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणूक : शिवसेनेच्या कलाबेन डेलकर विजयी

दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर विजयी झाल्या आहेत. भारतीय जनता पक्षापासून वेगळी झालेली शिवसेना महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातही आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नात शिवसेनेने गुजरातमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते.

Dadra Nagar Haveli Lok Sabha by-election
दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणूक
author img

By

Published : Nov 2, 2021, 3:12 PM IST

Updated : Nov 2, 2021, 3:41 PM IST

दादरा नगर हवेली - येथील दादरा नगर हवलेची खासदार मोहन डेलकर यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई येथे येऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर राजकारणात खळबळ उडाली होती. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून दिवंगत मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांचा 40 हजार मतांनी विजय झाला आहे.

भाजप आणि काँग्रेस उमेदवाराचा पराभव -

कलाबेन डेलकर यांनी भाजपच्या महेश गावित आणि काँग्रेसच्या महेश धोडी यांचा पराभव केला. दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाचा भाग असलेल्या दादरा आणि नगर हवेलीमधील सिल्वासा शहरातील कराड भागात सकाळी 8.30 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. अनुसूचित जमाती (एसटी) उमेदवारांसाठी राखीव असलेल्या या लोकसभा जागेसाठी ३० ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक झाली.

भारतीय जनता पक्षापासून वेगळी झालेली शिवसेना महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यातही आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नात शिवसेनेने गुजरातमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते. गुजरातमधील दादरा-नगर हवेली लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली. येथील खासदार मोहन डेलकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक झाली. येथून शिवसेनेने दिवंगत मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन यांना उमेदवारी देण्यात आली होती.

मोहन डेलकरांच्या मृत्यूने दादरा नगर हवेलीची जागा रिक्त

दादरा नगर हवेलीची जागा खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर रिक्त झाली होती. या लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर दिवंगत डेलकर यांच्या पत्नी कलाबेन आणि मुलगा अभिनव यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशानंतर लगेचच कलाबेन डेलकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी घोषित करण्यात आली होती.

मोहन डेलकर यांचा थोडक्यात परिचय

58 वर्षीय मोहन डेलकर हे दादरा आणि नगर हवेलीचे खासदार होते. 1989 मध्ये डेलकर पहिल्यांदा खासदारपदी निवडून आले होते. ते येथून सलग सहा वेळा खासदारपदी निवडून आले होते. मोहन डेलकर यांचा राजकीय प्रवास काँग्रेसपासून सुरु होऊन भाजप, भारतीय नवशक्ति पक्ष असा राहिला. मात्र 2019 मध्ये ते अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि विजयी झाले होते.

Last Updated : Nov 2, 2021, 3:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.