हैदराबाद - पॉर्न फिल्म रॅकेटमध्ये अटकेत असलेल्या उद्योगपती राज कुंद्राची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीने 29 माध्यम कंपन्या आणि संस्थावर मुंबई उच्च न्यायालयात अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला आहे. यावर उद्या न्यायालयात सुनावणी होणार आहे.
माध्यम संस्थांनी पोर्नोग्राफी प्रकरणात खोट्या बातम्या दिल्याचा दावा अभिनेत्री शिल्पा शेट्टीने याचिकेत केला आहे. तसेच प्रतिमा मलिन केल्याचे याचिकेत नमूद केले आहे.
शर्लिन चोप्राने सायबर सेलकडे केली होती तक्रार
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मॉडेल शर्लिन चोप्राची चौकशी केली. या चौकशीत शर्लिनने राज कुंद्रावर धक्कादायक आरोप केले आहेत. अनेक मीडियाकर्मी शर्लिन चोप्राला या विषयाबद्दल जाणून घेण्याची इच्छा व्यक्त करीत होते. या बद्दल खुलासा करताना ती म्हणाली , ''या प्रकरणात महाराष्ट्र सायबर सेलच्या इन्वेस्टीगेटिंग टीमला ज्या व्यक्तीने सर्वात पहिल्यांदा जवाब नोंदवला ती मी होती. याबद्दल टीमला माहिती पुरवणारी मी होते. जेव्हा मला समन्सची नोटीस पाठवण्यात आली होती तेव्हा मी भूमीगत झाले नाही. गायब झाले नाही. हे शहर किंवा देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. मार्च 2021 मध्ये सायबर सेलच्या ऑफिसवर जाऊन मी माझा निष्पक्ष जवाब नोंदवला. या विषयावर बोलण्यासारखे खूप काही आहे. पण हा विषय न्यायालयात आहे त्यामुळे त्यावर जास्त भाष्य करु शकत नाही. मी पत्रकरांना विनंती करते की सायबर सेलकडे मी जो जवाब दिला आहे त्याबद्दलचा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा.''
सेबीने बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टी, तिचा पती उद्योगपती राज कुंद्रा आणि त्याची कंपनी विवान इंडस्ट्रीजवर 3 लाखांचा दंड ठोठावला आहे. इनसायडर ट्रेडिंगच्या प्रकरणात हा दंड ठोठावला आहे.
हेही वाचा- Raj Kundra case: अभिनेत्री शिल्पा शेट्टी मुंबई पोलिसांच्या रडारवर?
राज कुंद्राच्या कोठडीत वाढ -
पोर्नोग्राफी तयार करून ते काही अॅपच्या माध्यमातून प्रसारित करण्याच्या प्रकरणात राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने १९ जुलैच्या रात्री अटक केली होती. २० जुलैला कुंद्राला न्यायालयात दाखल केल्यानंतर त्याला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर कोठडीची मुदत 27 जुलैपर्यंत वाढवण्यात आली होती. काल (मंगळवार) राज कुंद्राच्या पोलीस कोठडीची मुदत संपली, तेव्हा त्याला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी किला कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.
हेही वाचा-Raj Kundra Case: पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राच्या विरोधात ED घेऊ शकते अॅक्शन- सूत्र
शिल्पाच्या PNB खात्यावर क्राईम ब्रँचला संशय -
तपासादरम्यान मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाला शिल्पा आणि कुंद्राच्या जॉईंट अकाऊंटची माहिती मिळाली. पंजाब नॅशनल बँकेत (PNB) उघडलेल्या या खात्यात वर्षात कित्येक कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. क्राईम ब्रँचला असाही संशय आहे, की Hotshots App आणि Bolly Fame App कडून मिळालेली रक्कम शिल्पा-राजच्या या खात्यावर पाठविण्यात येत होती.तपासात याचीही माहिती मिळाली आहे, की या खात्यात डायरेक्ट ट्रांजेक्शन होत नव्हते. तर वेगवेगळ्या मार्गाने छोट्या-छोट्या रक्कमेने पैसे ट्रान्स्फर केले आहेत. याला टेक्निकली भाषेत प्लेसमेंट, लेअरिंग, इंटिग्रेशनची मोडस ऑपरेंडी म्हणतात. दरम्यान, 23 जुलैला जेव्हा गुन्हे शाखेच्या पथकाने शिल्पा शेट्टीच्या घरी छापा टाकला तेव्हा तिची या विषयीही चौकशी केली गेली.