ETV Bharat / bharat

...म्हणून शरद पवारांनी केले अमित शाहांचे अभिनंदन; वाचा भेटीचे कारण - sharad pawar meet amit shah

मागच्या महिन्यातच शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. पंतप्रधान कार्यालयाने ट्वीटच्या माध्यमातून या भेटीची माहिती देण्यात आली होती. ही सदिच्छा भेट असल्याचे राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले होते.

शरद पवारांनी अमित शहांची भेट घेतली
शरद पवारांनी अमित शहांची भेट घेतली
author img

By

Published : Aug 3, 2021, 1:43 PM IST

Updated : Aug 4, 2021, 7:57 AM IST

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नुकतीच भेट घेतली आहे. पवार यांच्यासोबत खासदार सुनील तटकरे आणि राष्ट्रीय साखर सहकारी संस्थेचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेकर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाची जबाबदारी असलेल्या अमित शाहंकडे सहकार मंत्रालयाची जबाबदारी आली आहे. त्यामुळे शरद पवारांनी सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन केल्याची माहिती पवारांनी ट्विटरवरून दिली.

  • Firstly, I congratulated Shri Amit Shah on being appointed as the first Co-operation Minister of India. During the meeting, We discussed the current sugar scenario of the country and problems occurring due to excessive sugar production.@AmitShah#Meeting #NewDelhi

    — Sharad Pawar (@PawarSpeaks) August 3, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एमएसपी आणि इथेनॉल उत्पादन युनिटची मागणी -

ऊसाला मिळणारा हमीभाव हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. शरद पवारांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने घेतलेल्या या भेटीत दोन मुख्य मागण्या करण्यात आल्या. ऊसाचा हमीभाव आणि साखर कारखान्याच्या आवारात इथेनॉल उत्पादनाच्या युनीटला परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या मागण्या अमित शाह मान्य करतील असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे.

रामदास आठवलेंनी पवार शाह भेटीवर प्रतिक्रिया दिली

काही दिवसांपूर्वी मोदींची घेतली भेट -

मागच्या महिन्यातच शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. पंतप्रधान कार्यालयाने ट्वीटच्या माध्यमातून या भेटीची माहिती देण्यात आली होती. ही सदिच्छा भेट असल्याचे राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले होते. मोदींसोबतच्या भेटीनंतर जवळपास 17 दिवसांनंतर ते अमित शाह यांची भेट घेतली आहेत.

तर मोदींसोबतच्या भेटीच्या एकदिवस आधीच केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. तर याबरोबरच शरद पवार यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती.

तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. तसेच पवार आणि राजनितिक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यातही बैठक झाली होती.

Last Updated : Aug 4, 2021, 7:57 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.