ETV Bharat / bharat

Sharad Pawar: गौतम अदानींच्या प्लांटचं चक्क शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन, काँग्रेससह 'इंडिया'च्या भुवया उंचावल्या? - लॅक्टोफेरिन प्लांट

Sharad Pawar : अहमदाबादमध्ये उद्घाटन कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गौतम अदानींसोबत एकत्र दिसले. साणंद तालुक्यातील चाचराडी गावात शरद पवार यांनी गौतम अदानी यांच्यासह लॅक्टोफेरिन प्लांटचे उद्घाटन केलंय. (country first Lactoferrin plant)

Sharad Pawar
शरद पवार यांनी गौतम अदानी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 23, 2023, 9:53 PM IST

Updated : Sep 23, 2023, 10:02 PM IST

अहमदाबाद Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज देशातील पहिल्या लॅक्टोफेरिन प्लांट एक्सिमपॉवरचे उद्‌घाटन उद्योगपती आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या उपस्थितीत केलंय. अनुभवी राजकारणी शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या उपस्थितीत झालेल्या या उद्घाटनामुळं राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. इंडिया आघाडी उद्योगपती गौतम अदानी यांच्याबाबत सहसा वादग्रस्त विधाने करत असते. त्यामुळं इंडिया आघाडीचे महत्त्वाचे नेते शरद पवार यांच्या हस्ते या प्लांटचं उद्घाटन झाल्यानं त्यांच्या गौतम अदानी यांच्याशी असलेल्या संबंधांची चर्चा होतेय.

  • It was a privilege to inaugurate India’s first Lactoferrin Plant Exympower in Vasna , Chacharwadi , Gujarat along with Mr. Gautam Adani pic.twitter.com/G5WH9FaO5f

    — Sharad Pawar (@PawarSpeaks) September 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राहुल गांधी यांचा आरोप : काँग्रेस नेते राहुल गांधी हे सातत्यानं गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत आहेत. लोकसभेत काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी आरोप केला होता की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि गौतम अदानी या दोन लोकांचंच पंतप्रधान मोदी ऐकतात. (country first Lactoferrin plant)

अदानी यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयाला भेट : आज सकाळी शरद पवार यांचे गुजरात राष्ट्रवादीचे नेते जयंत बोस्की यांनी स्वागत केलं. शरद पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस हा विरोधी इंडिया आघाडीचा भाग आहे. ज्याने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी सरकारला एकमतानं सामोरे जाण्याचा निर्णय घेतलाय. काँग्रेसही इंडिया आघाडीचा भाग आहे. त्यानंतर शरद पवार यांनी अहमदाबादमधील अदानी यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयाला भेट दिली. शरद पवार यांनी गौतम अदानी यांच्यासोबत लॅक्टोफेरिन प्लांटच्या उद्घाटनाची दोन छायाचित्रे x या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहेत.

सहा महिन्यात तीन बैठका : यापूर्वी गौतम अदानी आणि शरद पवार यांची 20 एप्रिल 2023 रोजी मुंबईत भेट झाली होती. गौतम अदानी हिंडेनबर्गच्या मुद्द्यावरून चर्चेत असतानाही बैठक झाली. यानंतर 2 जून 2023 रोजी शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यात आणखी एक बैठक झाली. जून 2023 ची बैठक सुमारे 30 मिनिटे चालली होती. (Sharad Pawar with Gautam Adani) . आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं पवार-अदानी यांच्या भेटीमागं काय-काय खलबतं झाली ते नजिकच्या भविष्यात पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा :

  1. Sharad Pawar On INDIA Bharat Contravesry: गेटवे ऑफ इंडियाला काय म्हणायचं- शरद पवारांचा थेट मोदींना प्रश्न
  2. Sharad Pawar News : शरद पवार ॲक्शन मोडमध्ये; आजी-माजी आमदारांची बैठक घेत 'हे' दिले आदेश
  3. Sharad Pawar in Jalgaon: राष्ट्रवादीच्या नेत्यांची पंतप्रधान मोदींनी चौकशी करावी, पण...शरद पवारांचे मोठे वक्तव्य

Last Updated : Sep 23, 2023, 10:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.