ETV Bharat / bharat

Delhi Jahangirpuri Violence : जहांगीरपुरी हिंसाचारात भाजप अन् त्यांच्या काही संघटनांचा हात; शरद पवार यांचा गंभीर आरोप - जहांगीरपुरी हिंसाचार घटनेत भाजपचा हात

दिल्लीच्या जहांगीरपुरी भागात (Delhi Jahangirpuri Violence) शनिवारी हनुमान जन्मोत्सव मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती. यानंतर हिंसाचाराची घटना घडली. या घटनेत एका नागरिकासह अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. दरम्यान, या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Allegation on BJP Jahangirpuri Violence) यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

sharad pawar
शरद पवार जहांगीरपुरी हिंसाचार
author img

By

Published : Apr 18, 2022, 10:39 PM IST

बंगळुरू(कर्नाटक) - दिल्लीच्या जहांगीरपुरी भागात (Delhi Jahangirpuri Violence) शनिवारी हनुमान जन्मोत्सव मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती. यानंतर हिंसाचाराची घटना घडली. या घटनेत एका नागरिकासह अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. दरम्यान, या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Allegation on BJP Jahangirpuri Violence) यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. या घटनेमागे भाजप आणि त्यांच्या काही संघटनांचा हात (BJP hand Delhi Jahangirpuri Violence) असल्याचा थेट आरोपच शरद पवार यांनी केला आहे. ते आज बंगळुरूमध्ये बोलत होते.

  • We never heard of communal violence during Ram Navami. The reason behind this is the BJP and some of their organisation. Delhi's law and order situation come under the Central government: NCP chief Sharad Pawar in Bengaluru pic.twitter.com/Rz9H9FBbda

    — ANI (@ANI) April 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शरद पवार यांचा भाजपवर निशाणा - रामनवमीच्या दरम्यान जातीय हिंसाचार झाल्याचे आम्ही कधी ऐकले नाही. दिल्लीतील हिंसाचारामागे भाजपा आणि त्यांच्या काही संघटनांचा हात आहे. दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते, असा थेट आरोपच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर केला आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी दिल्लीत हिंसाचार झाला होता. याप्रकरणी जवळपास 20 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून तणावपूर्व वातावरण आहे.

आतापर्यंत 20 आरोपींना अटक - दिल्ली हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 20 जणांना अटक केली आहे. यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असून पोलिसांनी तीन पिस्तूलांसह पाच तलवारीही जप्त केल्या आहेत. हनुमान जयंतीनिमित्त 16 एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आल्याची घटना दिल्लीतील जहांगीरपुरी येथे घडली होती. या हिंसाचार प्रकरणी नोंदवण्यात आलेल्या एफआयआरनुसार, ही मिरवणूक जहांगीरपूरच्या सी ब्लॉकमधील जामा मशिदीजवळ पोहोचली त्यावेळी अन्सार नावाच्या एका व्यक्तीने चार-पाच साथीदारांसह मिरवणुकीत सामील लोकांसोबत वाद घालू लागला. यानंतर हा वाद वाढत गेला आणि दगडफेक झाली. यावेळी मोठ्या प्रमाणात जाळपोळही करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.