ETV Bharat / bharat

Bageshwar Baba Gujarat Visit : बागेश्वर बाबांच्या गुजरात दौऱ्यावरून वाद, माजी मुख्यमंत्री वाघेला म्हणाले - 'बाबा धर्माच्या नावाखाली.. - Bageshwar Baba Shankersinh Vaghela

बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांच्या गुजरात दौऱ्यावरून वाद सुरू झाला. गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी त्यांच्यावर धर्माच्या नावाखाली राजकारण केल्याचा आरोप केला आहे.

Bageshwar Baba
बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री
author img

By

Published : May 19, 2023, 7:00 PM IST

अहमदाबाद : मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांच्या गुजरात दौऱ्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. धिरेंद्र शास्त्री गुजरातच्या राजकोट, सुरत आणि अहमदाबादमध्ये दिव्य दरबाराची तयारी करत आहेत. या कार्यक्रमावरून गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी धिरेंद्र शास्त्रींवर टीका करत ते भाजपचे हत्यार असून ते धर्माच्या नावाखाली राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.

'हा भाजपचा डाव आहे' : वाघेला म्हणाले की, भाजप आपल्या राजकीय डावपेचाचा भाग म्हणून खोटे चमत्कार आणि धार्मिक प्रचाराचे काम करत आहे. लिलीया, सावरकुंडला येथील माजी आमदार प्रताप दुधात यांनी शास्त्री यांना कापसाच्या भावाबाबत एक व्यंगात्मक पत्र लिहिले आहे. 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांना कापसाचा भाव 1500 वरून 2400 रुपयांपर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिले होते. धिरेंद्र शास्त्री यांचा 1 आणि 2 जून रोजी राजकोट येथील रेसकोर्सवर एक कार्यक्रम होणार आहे.

शास्त्रींवर अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप : राजकोट कमर्शियल को - ऑपरेटिव्ह बँकेचे सीईओ पुरुषोत्तम पिपरिया यांनी धिरेंद्र शास्त्रींना सोशल मीडियावर आव्हान दिले आहे. ते म्हणाले की, धिरेंद्र शास्त्रींनी गुजरातमध्ये अंमली पदार्थ कसे प्रवेश करतात ते सांगावे. पिपरिया यांनी या माहितीसाठी पाच लाखांचे बक्षीस देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी शास्त्री यांच्यावर वशिकरण विज्ञानाचा गैरवापर करून अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे. या आधी धीरेंद्र शास्त्री यांच्या बिहार दौऱ्याबाबत भाजप, आरजेडी आणि जेडीयू यांच्यात जोरदार वाद झाला होता. भाजपने शास्त्रींच्या समर्थनार्थ वक्तव्य केले होते, तर आरजेडी आणि जेडीयूने त्यांच्या विरोधात वक्तव्य केले होते.

हेही वाचा :

  1. Nathuram Godse Birth Anniversary : हिंदू महासभेने साजरी केली नथुराम गोडसेची जयंती, कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट
  2. ED Seizes Chinese Company Funds : ईडीची बंगळुरूतील चीनी शैक्षणिक संस्थेवर कारवाई; 8.26 कोटी केले जप्त
  3. Fine On Bageshwar Baba : बिहार सरकारने बागेश्वर धाम बाबावर ठोठावला दंड, जाणून घ्या काय आहे कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.