हैदराबाद : प्रदोष व्रत आणि प्रदोषम व्रत हे प्रसिद्ध हिंदू व्रत आहेत, जे भगवान शिवाचा आशीर्वाद घेण्यासाठी पाळले जातात. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्यात दोनदा येते, कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षात. हे व्रत दोन्ही पक्ष त्रयोदशीच्या दिवशी पाळतात. प्रदोष व्रत सोमवारी पडल्यास त्याला 'सोम प्रदोष' म्हणतात. जर तो मंगळवारी पडला तर त्याला 'भूम प्रदोष' म्हणतात आणि जर तो शनिवारी पडला तर त्याला 'शनि प्रदोष' म्हणतात. हे व्रत सूर्यास्ताच्या वेळेवर अवलंबून असते.
शुभ मुहूर्त : प्रदोष व्रतामध्ये संध्याकाळी सूर्यास्ताच्या ४५ मिनिटे आधी आणि सूर्यास्तानंतर ४५ मिनिटांपर्यंत भगवान शिवाची पूजा केली जाते. प्रदोष व्रत शनिवार, 4 मार्च 2023 रोजी सकाळी 11:43 वाजता सुरू होईल. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार, ५ मार्च रोजी दुपारी २:०७ वाजता समाप्त होईल.
भगवान शिव हे शनिदेवाचे गुरू : ज्योतिष्य शिव मल्होत्रा यांनी सांगितले, 'भगवान भोलेनाथ न्यायाधीश असलेल्या शनिदेवाचे गुरु आहेत. त्यामुळे शनिवारी प्रदोष व्रत पाळल्याने, शिवासह शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो. शनि त्रयोदशीचा उपवास घडतो. हे व्रत कामना पूर्तीसाठी महत्वाचे आणि शुभ मानले जाते. पौराणिक कथेत सांगितल्याप्रमाणे शनि प्रदोष व्रताचे फळ म्हणजे निपुत्रिक जोडप्यांना पुत्रप्राप्ती होते. प्रदोष तिथीच्या दिवशी भगवान भोलेनाथाने विश्वाची निर्मिती केली होती, आणि सृष्टी विलीनही केली होती, असे मानले जाते.
असा अभिषेक करावा : ज्योतिषी शिव मल्होत्रा यांनी सांगितले की, 'शनि प्रदोष व्रताच्या दिवशी दशरथाने लिहिलेल्या शनिस्त्रोताचे पठण केल्यास, जीवनात शनीचा कोप टळतो. बेलाची 108 पाने गंगाजलात टाकुन शंकराचा अभिषेक करा. असे मानले जाते की, या पद्धतीने पूजा करणारे भाविक सर्व धन आणि सर्व दुःखांपासून मुक्त होतात.
भगवान शंकराची पूजा : ज्योतिषी शिव मल्होत्रा यांनी सांगितले की, 'त्रयोदशीच्या दिवशी प्रदोष काळात भगवान शंकराची पूजा करण्याचा नियम आहे, असे केल्याने जीवनात फक्त आनंद मिळतो. म्हणून या दिवशी भगवान भोलेनाथाचे दर्शन घेतले पाहिजे. ज्या क्रमानुसार हा दिवस येतो, त्यानुसार याला नाव पडले आहे, जसे की महाशिवरात्रीला शनिवार आला. प्रदोष व्रत हे शनिवारी आले. यामुळे या दिवशी 'शनि प्रदोष' असे नाव पडले. शनि प्रदोष या दिवशी भगवान शंकर आणि शनिदेवाच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे.
Shani Pradosh Vrat 2023 : शनि प्रदोष व्रतात कशी केली जाते पूजा, शुभ मुहूर्त कोणता - भगवान भोलेनाथ
इंग्रजी दिनदर्शिकेनुसार, प्रदोष व्रत शनिवार, 04 मार्च 2023 रोजी आहे. प्रदोष व्रत भोलेनाथांना अतिशय प्रिय आहेत. या दिवशी भगवान भोलेनाथाची पूजा केल्याने भक्तांना दुप्पट फळ मिळते. प्रदोष व्रत 4 मार्च 2023 रोजी सकाळी 11:43 वाजता सुरू होईल. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार, ५ मार्च रोजी दुपारी २:०७ वाजता समाप्त होईल.